10 वी परीक्षेच्या गुणांमध्ये नुमवि शाळेने फेरफार करून प्रथम क्रमांकापासून वंचित ठेवल्याचा आरोप


पुणे:  यावर्षी कोरोनाच्या प्रादूर्भावाने एसएससी बोर्डाची १०वीची ऑफलाईन परिक्षा झाली नाही . बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली  एसएससी निकाल शाळेने तयार केला होता. निकाल तयार करताना इयत्ता ९ वीचे वार्षिक गुणाच्या ५०% गुण व दहावीचे अंतर्गत ५० गुण असा १० वीचा निकाल तयार करण्यात आला. हा निकाल तयार करताना नुमवि शाळेने जाणीवपूर्वक कमी गुण दिल्याचा आरोप एका विद्यार्थ्याच्या आईने केला आहे. 

सक्षम संदीप तेलतुंबडे हा विद्यार्थी सन २०२०-२१ या वर्षात नुमवि प्रशाला पुणे  या शाळेत इयत्ता १०वीत शिकत होता. सक्षम हा विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथी नुमवि प्राथमिक शाळेत शिकला तो नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याने ४ थीची शिष्यवृत्ती मिळवली आहे. इ.५ वी ते १०वी  तो नुमवि माध्यमिक शाळेत शिकत होता. ५ वी ते ९ वी तो सर्व तुकड्यांमध्ये प्रथम आला आहे. शाळेने यावर्षी दहावीचा निकाल तयार करताना सक्षमचे ९ वी चे संस्कृत विषयाचे गुणे ९८ ऐवजी ९३ मांडले तर यश भोसले या विद्यार्थ्याचे संस्कृतचे गुण ७० ऐवजी ९२ मांडले म्हणजेच सक्षमचे ५ गुण कमी तर यश भोसलेचे २२ गुण अधिक मांडले. दहावीच्या अंतर्गत गुणांमध्ये सक्षम ला संस्कृत विषयांमध्ये सराव परीक्षेत ८० पैकी ८० गुण आहेत.


आम्ही याविषयी एसएससी बोर्ड अध्यक्ष/सचिव तसेच शिप्र नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय एस.के.जैन तसेच आयुक्त,संचालक माध्यमिक तसेच उपसंचालक, शिक्षण अधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे.  शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही दाद दिली जात नाही, दखल घेतली जात नाही, आम्ही जिल्हाधिकारी व पोलीस कमिशनर यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्याबाबत जातिवाद केल्याने ॲट्रॉसिटी ॲक्ट मागणी करणार आहोत.या अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत जयश्री तेलतुंबडे यांनी दिली .

 जयश्री तेलतुंबडे म्हणाल्या ,म्हणजेच  ३० गुणांपैकी३०  गुण होतात असे असताना शाळेने त्याचे २४ गुण पाठवले. म्हणजेच आठ गुण कमी पाठवले याउलट यश भोसले चे ७८ गुण होत असताना ११ गुण वाढवून ८९ गुण पाठवले. अशाप्रकारे शाळेने त्याला डावलून यश भोसले चा प्रथम क्रमांक काढला. प्रशालेत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला १५ ऑगस्टला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते व त्याच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमास सक्षम तेलतुंबडेला रोखण्यात आले. तसेच सक्षम याची मराठी विषयाची उत्तरपत्रिका पुन्हा तपासली असता त्याला काही उत्तरांना गुणदान केले नाहीत. अशाप्रकारे सक्षम हा केवळ मागासवर्गीय विद्यार्थी असल्याने आकस ठेऊन जातीय  द्वेषाने  त्याला प्रथम क्रमांकापासून वंचित ठेवण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: