फेरीवाल्यांची लवकरच मस्ती उतरवणार – राज ठाकरे

मुंबई : परप्रांतीय फेरीवाल्यांकडून शासकीय अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. भीती काय असते हे त्या फेरीवाल्याला जेलमधून बाहेर आल्यावर दाखवून देणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे अशा शब्दात सज्जड दमच राज ठाकरेंनी यावेळी दिला. एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची बोट छाटायची फेरीवाल्यांची हिंमतच कशी होते असाही सवाल त्यांनी यावेळी केला. या घटनेच्या निमित्ताने मनसे पुन्हा एकदा परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर लवकरच आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. 

ठाणे महापालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  हल्ला करणारा फेरीवाला हा पोलिसांकडून ज्यादिवशी सुटणार, त्यादिवशी आमच्याकडून मार खाणार अशा शब्दातच इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला. फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे, असेही ते म्हणाले. ज्यादिवशी यांचीही बोट छाटली जातील आणि त्यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल. या फेरीवाल्यांची हिंमत कशी होते ? असा सवालही त्यांनी केला. केवळ निषेध करून सुधारणारी ही लोक नाहीत. भीती काय असते हे त्यांना जेलमधून बाहेर आल्यानंतर कळेल असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: