पुढील 24 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

पुणे : गेली दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. आज दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.  


उद्या मुंबईसह पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत पाऊसाची धुव्वाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे. ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. पालघर वगळता संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी अति तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे पुण्यासह अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग औरंगबादसह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्वचं जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान याठिकाणी वेगवान वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.

राज्यात 1 सप्टेंबर रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज
मंगळवारि (ता. 1) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान नसल्याने बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या (ता. 1 कोकणात काही ठिकाणी उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :
सिंधुदुर्ग : मुलदे (कृषी) 28, वैभववाडी 35.

मध्य महाराष्ट्र :
नंदूरबार : अक्कलकुवा 40.

मराठवाडा :
औरंगाबाद : सिल्लोड 45.
बीड : आष्टी 67, परळी वैजनाथ 69.
जालना : भोकरदन 78, जाफराबाद 90.
परभणी : पालम 78.

Leave a Reply

%d bloggers like this: