हिरो इलेक्ट्रिकची व्हील्स ईएमआय प्रायव्हेट लिमिटेडसोबत इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीला चालना देण्यासाठी भागीदारी

पुणे : हिरो इलेक्ट्रिक या भारताच्या सर्वांत मोठ्या ईव्ही दुचाकी कंपनीने आज व्हील्स ईएमआय प्रायव्हेट लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली असून त्याद्वारे इलेक्ट्रिक दुचाकीसाठी वित्तपुरवठ्याचे सोपे पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हिरो इलेक्ट्रिककडून सध्या दर महिन्याला १०,००० दुचाकी विकल्या जातात. त्यातील ४० टक्के विक्री भारतातील ग्रामीण भागांमधून होते. या भागीदारीसोबत कंपनीला विक्रीत वाढीची अपेक्षा आहे आणि २०२१ या वर्षाच्या शेवटपर्यंत विक्री दुप्पट होईल, असा अंदाज आहे.

वाढत्या इंधनाच्या किंमती आणि फेम-२ सवलतींमध्ये सुधारणांसह ईव्ही दुचाकीचा पर्याय निवडून हरित क्रांतीचा भाग होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. ग्राहकांना वेगवान खरेदीचा निर्णय घेण्यासाठी सुविधा आणि मदत केल्यामुळे ग्राहक आता नवी कोरी हिरो इलेक्ट्रिक ईव्ही व्हील्स ईएमआयकडून दिल्या जाणाऱ्या विविध वित्तपुरवठ्याच्या पर्यायांद्वारे खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

या भागीदारीतून हिरो इलेक्ट्रिकच्या ग्राहकांना अतिरिक्त फायदेही दिले जातील. जसे आकर्षक व्याजदर, लवचिक कालावधीचे पर्याय आणि ग्राहकाच्या पात्रतेनुसार परवडणारे ईएमआय. प्राधान्याचा वित्तीय भागीदार म्हणून व्हील्स ईएमआय हिरो इलेक्ट्रिकच्या ग्राहकांना कमीत कमी कागदपत्रांसह सुलभ आणि वेगवान वित्तपुरवठा करू शकेल.

व्हील्स ईएमआयकडून १० राज्यांमध्ये हिरो इलेक्ट्रिकच्या ग्राहकांना कर्ज सुविधा दिल्या जात आहेत. त्यात ४२ ठिकाणे आणि ६० डीलरशिप आऊटलेट्स समाविष्ट आहेत. व्हील्स ईएमआयने उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागांना आर्थिक मदत दिली आहे- जसे कौशंबी, चंदौली, बस्ती, महाराजगंज आणि उत्तरप्रदेशकडून व्हील्स ईएमआय व्यवसायात जवळपास ६० टक्के योगदान दिले जाते.

हिरो इलेक्ट्रिकच्या अद्ययावत दुचाकी रिटेल वित्तपुरवठा भागीदारीबाबत बोलताना  सोहिंदर गिल- मुख्य कार्यकारी अधिकारी, हिरो इलेक्ट्रिक म्हणाले की, ”मागील काही आठवड्यांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकीबाबत जागरूकता आणि मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याची कारणे विविध असू शकतात जसे सुधारित फेम २ आणि राज्यातील धोरणे व इंधनाच्या किमतीतील वाढ. आज जास्तीत जास्त ग्राहक आपल्या पुढील सुधारणेसाठी इलेक्ट्रिक दुचाकीच्या पर्यायाची चौकशी आणि विचार करत आहेत. आपल्या आवडीची दुचाकी खरेदी करण्यासाठी लवचिक वित्तपुरवठ्याच्या पर्यायाचीही मागणी, विशेषतः ग्रामीण भारतातून होऊ लागली आहे. व्हील्स ईएमआय ही दुचाकी वित्तपुरवठ्यातील आघाडीची कंपनी असून ती ग्रामीण घरांमधील कर्जाच्या आवश्यकता समजू शकते.

Leave a Reply

%d bloggers like this: