बोगस बाळूमामा प्रकरण : ‘त्या’ प्रकरणी खंडणी व अब्रुनुकसानिचा गुन्हा दाखल करणार – मनोहर भोसले

पुणे : मी कोणत्याही व्यक्तीस एका ही रुपयांची मागणी केलेली नाही. मी फक्त बाळुमामांची सेवा करतो. माझ्याकडे आलेले भक्तगण हे त्यांचे स्वच्छेने शिव सिद्धि संचालित श्री मामा संस्था या संस्थेकडे देणगी देतात. सदरची देणगी ही केवळ मंदिर बांधकाम तसेच भक्त निवासासाठी वापरली जाते. याबाबत कोणासही आक्षेप असल्यास मी कोणासमोरही जाण्यास तयार आहे, असा खुलासा सद्गुरु मामा भोसले यांचे भक्त मनोहर मामा चंद्रकांत भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच आरोप करणाऱ्या व्यक्तींना खंडणी न दिल्याने माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. सदर प्रकरणी मी  खंडणी तसेच अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही भोसले यांनी यावेळी सांगितले.    

काही दिवसांपूर्वी मनोहर भोसले हे ‘बुवाबाजी’ करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर आज भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

भोसले म्हणाले, गेली पंधरा वर्षे पासून मी ऊंदरगाव ता. करमाळा जिल्हा सोलापूर या पत्त्यावर राहावयास असून मी श्री सदगुरु बाळुमामा यांची मनोभावे सेवा करत असतो. अनेक भक्तगण मी स्थापन केलेल्या मंदिरास भेट देण्यासाठी येथे येतात. श्री संत बाळूमामा याचे विचार व आचरण भोळ्याभाबड्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करत असतो. सदरचे काम हे गेली दहा वर्ष पासून चालू आहेत. काही नास्तिक लोकांना ही गोष्ट न आवडल्याने माझ्यासह भक्तांवर खोटे आरोप करून त्याला ‘बुवाबाजी’चे नाव देऊन माझी बदनामी करत आहेत. मी स्वतः ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला असून मी त्या माध्यमातून अनेक लोकांना धार्मिक सल्ले व पारायण करण्याचा सल्ला देत असतो. मी कायद्याचा आदर करणारा व्यक्ती असून आमची ही धार्मिक वृत्ती काही नास्तिक लोकांना पटली नसल्याने मला खंडणी मागितली गेली. ती न दिल्याने माझ्यावर आरोप होत आहेत. 

ते पुढे म्हणाले, बाळूमामा यांची समाधी असलेल्या आदमापुर या गावातील लोकांना ‘मी बाळूमामाचा वंशज नाही’, असा ठराव पास केला. ना मी कोणताही अवतार आहे, ना कोणता बाबा ना कोणता महाराज.” मी केवळ एक भक्त म्हणून त्यांची सेवा करत आहे. केवळ माझ्याकडे आलेल्या लोकांची गर्दी पाहून काही लोकांना ते न आवडल्याने माझ्यावर आरोप होत आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: