अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे अ‍ॅक्सिस कन्झम्शन इटीएफ सादर

पुणे :भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेल्या फंडांपैकी एक असणाऱ्या  अ‍ॅक्सिस   म्युच्युअल फंडातर्फे ‘ अ‍ॅक्सिस कन्झम्शन इटीएफ’ सादर करत असल्याची घोषणा आज करण्यात आली. नवीन फंड योजना (एनएफओ) सोमवारी, ३० ऑगस्ट रोजी खुली होत असून एक्स्चेंज ट्रेडेड फंड द्वारे त्याचा उपयोग केला जाणार आहे.नवीन फंडाच्या योजनेतून दीर्घ कालीन संपत्ती निर्माण सुविधा मिळणार असून निफ्टी इंडिया कन्झम्शन निर्देशांक शेअर्स मध्ये गुंतवणूक करून परतावा मिळविण्याचे ध्येय आहे.

भारतीय आर्थिक बाजारपेठेतील सहनशील गुंतवणुकीच्या क्षमतेला बरीच जास्त गती मिळाली असून ती तशीच राहील असे दिसत आहे. निर्देशांक फंड आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंड ही त्यासाठीची दोन सर्वाधिक लोकप्रिय साधने आहेत. विरोध न करणारी गुंतवणूक हे कमी अडथळा उत्पन्न करणारे गुंतवणूक धोरण आहे आणि जितक्या जवळून शक्य होईल तितक्या जवळून एखाद्या विशिष्ट निर्देशांकावर ते लक्ष ठेवतात.

कमी खर्चाच्या जोडीलाच, सेक्टर फंडासारखी दिवस अखेरीच्या किंमतीपेक्षा इटीएफ गुंतवणूकदारांना त्या त्या वेळच्या किंमतीना गुंतवणूक करायला देतात. त्यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांच्या इनफ्लो आणि आउटफ्लो पासून त्यांच्या गुंतवणुकीला संरक्षण मिळते. त्याही पुढे जाऊन इटीएफ हे मालमत्ता संबंधित कामगिरी बाबत सर्वोत्तम आहेत आणि बाजारपेठेला तत्काळ प्रदर्शित करणाऱ्या आणि त्यायोगे रोखीची समतुल्यता साधण्यासाठी सर्वाधिक लवचिक साधनांपैकी एक आहे.

निफ्टी इंडिया कन्झम्शन यामध्ये विविध क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे जसे की ग्राहकोपयोगी अल्पकालीन टिकणाऱ्या वस्तू, आरोग्य सेवा, ऑटो, दूरसंचार सेवा, औषधनिर्माण, हॉटेल्स, प्रसारमाध्यमे आणि मनोरंज इत्यादी. ज्यातून आजच्या भारतातील अत्यावश्यक आणि विवेकाधीन गोष्टींवर होत असलेल्या खर्चाचा अंदाज येऊ शकतो. मुक्त बाजारपेठीय भांडवलीकरणातून निफ्टी इंडिया कन्झम्शन निर्देशांकात ३० सर्वाधिक मोठ्या उपभोक्ता कंपन्या समाविष्ट आहेत.

अ‍ॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले कीजबाबदार फंड हाउस म्हणून आम्ही  अ‍ॅक्सिस एएमसी मध्ये ठामपणे उभे आहोत. गुणवत्तापूर्ण, दर्जेदार उत्पादने आमच्या ग्राहकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि सध्याच्या परिस्थितीत दीर्घकाळ परतावा देण्याशी संबंधित आहोत. गेल्या काही दशकांपासून उपभोक्ता बाजारपेठ नेहमीच मजबूत आणि सतत वाढीच्या मार्गावर राहिली आहे. बाजारपेठेत स्थिर आणि सातत्यपूर्ण दीर्घकालीन विकासासाठी  अ‍ॅक्सिस कन्झम्शन इटीएफ ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे असे मला वाटते.”

Leave a Reply

%d bloggers like this: