Tokyo Paralympics 2020-21: थाळीफेकपटू विनोद कुमार यांचे कांस्यपदक परत घेणार

टोकियो : टोकियोत पॅरालिम्पिकमध्ये थाळीफेकमध्ये कांस्य पदक जिंकणारे भारतीय खेळाडू विनोद कुमार यांचे कांस्य पदक परत घेतले जाणार आहे. विनोद यांनी थाळीफेकीत F52 गटात कांस्यपदक जिंकले होते, परंतु या कॅटगरीसाठीच्या नियमात ते मोडत नसल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धींनी नोंदवला. तपासाअंती त्यांच्याकडून हे पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीनं घेतला. पीटीआयने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ने सांगितलं होतं की, 19.91 मीटर डिस्कस फेकून विनोद कुमार यांनी आशियात नवीन विक्रमाची नोंद केली होती.

दरम्यान, 41 वर्षीय विनोद कुमार यांची बीएसएफमध्ये निवड झाल्यानंतर प्रशिक्षणा दरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. लेहमध्ये एका उंच खडकावरून खाली पडल्याने त्याने जवळजवळ एक दशकापर्यंत अंथरुणाला खिलून होते.  या काळात त्यांनी आपले दोन्ही पालक गमावले. जवळपास 2012 च्या सुमारास त्याची प्रकृती सुधारली आणि 2016 च्या रिओ गेम पासून त्यांच्या पॅरा-स्पोर्ट्ला सुरूवात झाली होती.

 

Leave a Reply

%d bloggers like this: