Tokyo Paralympic 2020-21 : सुमित अंतीलला भालाफेकीत सुवर्णपदक, तीन विश्वविक्रमाची नोंद  

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू सुमित अंतील याने सुवर्णपदक पटकावले. सुमित अंतीलने 68.55 मीटर एवढ्या अंतरावर भाला फेकत जागतिक विक्रमाचीही नोंद केली आहे. विशेष म्हणजे, सुमितनं पहिल्या फेरीत  66.95 मीटर (विश्वविक्रम), दुसऱ्या फेरीत  68.08 मीटर (विश्वविक्रम) तर पाचव्या फेरीत 68.55 मीटर (विश्वविक्रम) भाला फेकत तीनवेळा विश्वविक्रमाची नोंद केली आहे. त्यामुळे जगभरातून त्याच्या या ‘सुवर्ण’कामगिरीचं कौतुक होत आहे. आज (30 ऑगस्ट) भारताच्या नावावर दोन सुवर्णपदकाची नोंद झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित चे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: