जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी कडून चौकशी 

दिल्ली : मनी लाँडरिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून दिल्लीत अनेक तास चौकशी सुरू आहे. सकाळ पासून अंमलबजावणी संचालनालयात तिची चौकशी चालू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही चौकशी रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

जॅकलिन फर्नांडिस ही श्रीलंकेची नागरिक असून गेल्या 12 वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे. अमिताभ बच्चन स्टारर अलादीन या चित्रपटातून तिने 2009 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2006 मध्ये ती  ‘मिस श्रीलंका’ ठरली. तर मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: