मिया बाय तनिष्कचे नवे कलेक्शन ‘किस ऑफ स्प्रिंग’

पुणे :  निसर्ग आपल्या अतिशय अनोख्या पद्धतीने आपल्याला सतत जाणीव करून देत असतो की जीवनात काहीही कायमस्वरूपी टिकून राहत नाहीतसेच जीवनातील प्रत्येक टप्पा हा एक सुंदर आशीर्वाद असतो. उदाहरणार्थवसंत ऋतू म्हणजे आपण सर्वांनी आपल्या सर्व क्षमतांनिशी बहरले पाहिजे आणि स्वतःतील सर्वोत्तम गुण दाखवून दिले पाहिजेत याची आठवण करून देण्याची निसर्गाची अनोखी पद्धतच आहे.  वसंत ऋतूमध्ये बहरून येणारे तेजस्वी रंग वृद्धी व नवचैतन्य दर्शवतात.  याच संकल्पनेला अनुसरून भारतातील सर्वात फॅशनेबल ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक मिया बाय तनिष्कने किस ऑफ स्प्रिंग हे नवे कलेक्शन सादर केले आहे जे वसंत ऋतूचा ताजेपणा आणि तेज यांची अनुभूती मिळवून देते.

किस ऑफ स्प्रिंग कलेक्शन निसर्गापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले असून फुलांच्या सौंदर्याचा अनोखा आविष्कार यामध्ये घडवण्यात आला आहे.  रंगीत मौल्यवान खडे आणि हिऱ्यांचा मुबलक वापरशिल्पकलीय भूमिती आणि फुलांचेकळ्यांचे मोहक रंग ही किस ऑफ स्प्रिंगची वैशिष्ट्ये आहेत.  निसर्गाविषयीच्या अतीव प्रेमातून निर्माण झालेल्या सौंदर्यानुभव घेण्याच्या वृत्तीला अनुसरून तयार करण्यात आलेली ही डिझाईन्स मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते अधिक दृढ व गहिरे करतात.

कळ्या व संपूर्ण फुललेल्या फुलांच्या स्वरूपात फुलांच्या आकृतिबंधांचा सुरेख मेळ किस ऑफ स्प्रिंगमध्ये साधण्यात आला आहे.  अतिशय उत्तम टेक्श्चर्स असलेले हे दागिने कोणत्याही प्रकारच्या पेहरावावर अतिशय खुलून दिसतात.  डिझाईन्सच्या तोडीस तोड असलेले उत्तमोत्तम रंग पाहताक्षणी मनामध्ये वसंत ऋतूतील निसर्गसारखी बहार खुलवतात.  १४ कॅरेट सोनेहिरे आणि रंगीत मौल्यवान खडे यामध्ये घडवण्यात आलेले या कलेक्शनमध्ये वसंत ऋतूतील ताजेपणाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

मिया बाय तनिष्कच्या बिझनेस हेड श्यामला रमणनयांनी सांगितले, “वसंत ऋतू म्हणजे पुनःजागृतीचा काळ, नैसर्गिक आणि आध्यात्मिक जगातही या ऋतूचे हेच महत्त्व मानले जाते.  सुंदर गोष्टी आणि सुंदर भावना जागृत होऊन नवआरंभ होण्याचा हा ऋतू आहे. ‘किस ऑफ स्प्रिंग’ हे नवे कलेक्शन सादर करून आम्ही मिया महिलांना सकारात्मकता, आशा बाळगण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीला निर्भयतेने सामोरे जाण्याचा संदेश देत आहोत. फॅशनच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट अशी ही अनोखी डिझाईन्स पाहताक्षणी आवडतील.

Leave a Reply

%d bloggers like this: