इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन- डीव्हीसीए,केडन्स, अँबिशियस संघांची विजयी सलामी

पुणे : डीव्हीसीए, केडन्स, अँबिशियस संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

डेक्कन जिमखाना मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन दुर्गावती जिंदल, संतोष शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष दर्शन जिंदल, सचिव सनय सेनगुप्ता, संचालक महेश देशमुख, आंशुल शर्मा, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे खजिनदार शुभंकर भंडारकर, नसरीन एजलर, पोरस अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या लढतीमध्ये अँबिशियस संघाने डेक्कन जिमखाना संघाला पराभूत करताना विजय साकारला. हर्षल हाडके व मल्हार वंजारी यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर अँबिशियस संघाने प्रथम फलंदाजी करताना ४८.२ षटकांत ७ बाद २४१ पर्यंत मजल मारली. डेक्कन जिमखाना संघाला हे आव्हान पेलवले नाही, डेक्कन संघाला ३४.२ षटकांत ९ बाद १५९ धावाच करता आल्या.

संक्षिप्त धावफलक:

अँबिशियस विरुद्ध डेक्कन जिमखाना 

अँबिशियस : ४८.२ षटकांत ७ बाद २४१ (हर्षल हाडके ७७, ५ चौकार, २ षटकार, मल्हार वंजारी ७३, ११ चौकार, हृषिकेश बारणे १९, १ चौकार, वरद काणे ६-२४-०-२, अजय बोरूडे ९-१-२९-२, निखिल धरणे ६-१-२७-२)  वि  वि डेक्कन जिमखाना ३४.२ षटकांत ९ बाद १५९ (अथर्व वानवे ५४, ४ चौकार, जय पाटील ३३, १ चौकार, क्रिश शहापूरकर २५, ५ चौकार, ऋषिकेश बारणे ६-०-२४-४, सरिश देसाई ६-०-१९-१, औक्षण जाधव २-०-१४-१, आदित्य राजहंस ६.२-०-१९-१) सामनावीर : ऋषिकेश बारणे

केडन्स विरुद्ध ब्रिलियंट्स 

केडन्स : ५० षटकांत ३ बाद ३४५ (अर्शिन कुलकर्णी १५६, १६ चौकार, ७ षटकार, अनिरुद्ध साबळे १०६, १८ चौकार, प्रद्युम्न चव्हाण ४६, २ चौकार, ४ षटकार, मोहम्मद अतिशन १०-२-९३-२, आर्य शहा १०-१-५६-१) वि वि ब्रिलियंट्स ४१.५ षटकांत सर्वबाद २४३ (उत्कर्ष चौधरी ७२, ६ चौकार, ५ षटकार, प्रतीक भुईमकर ४३, ७ चौकार, आर्य शहा ४१, ५ चौकार, ३ षटकार, रझाक फल्लाह १०-०-५२-४, सोहम सरवदे ९-१-१८-३, शुभम खरात ८-०-५६-२, अनिरुद्ध साबळे ०.५-०-६-१) सामनावीर : अर्शिन कुलकर्णी

डीव्हीसीए विरुद्ध जिल्हा संघ 

डीव्हीसीए : ५० षटकांत ७ बाद २८६ ( अंश धूत ९४, ९ चौकार, १ षटकार, विकी ओस्तवाल ७०, १० चौकार, रोहित चौधरी ६७, १० चौकार, ३ षटकार, नचिकेत ठाकूर १०-२-४१-२, ओंकार पटकळ ९-०-४४-२, रिषभ बन्सल ९-०-६४-२) विवि जिल्हा संघ ३२.१ षटकांत सर्वबाद १२९ (गुरविर सिंग सैनी २८, १ चौकार, २ षटकार, अभिनंदन गायकवाड २४, ४ चौकार, रोहित चौधरी ८-०-३१-४, तिलक जाधव ५.१-०-१८-२, ओंकार राजपूत ५-०-३०-२) सामनावीर : रोहित चौधरी

Leave a Reply

%d bloggers like this: