fbpx

Tokyo Paralympics 2020-21: भारतासाठी आजचा दिवस ठरला सोनेरी, दोन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक 2020मध्ये भारताचा डंका वाजत असून आजचा दिवस भारतासाठी सोनेरी ठरला. भारताच्या खेळाडूंनी आज उत्तम कामगिरी करीत दोन सुवर्ण पदकांसह तब्बल पाच पदकांची कमाई एका दिवसात केली आहे. तर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात 7 पदकं जमा झाली आहेत.

दिवसाची सुरूवात नेमबाज अवनी लेखारा (शूटिंग) हिच्या सुवर्ण पदकाने झाली. अवघ्या 19 वर्षांच्या अवनीने नेमाबाजीत सुवर्णपदक मिळवीत एक इतिहास रचला.  पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही पहिला महिला खेळाडू ठरली. त्यानंतर योगेश कथुनिया याने थाळी फेक (डिस्कस थ्रो)मध्ये रौप्य पदक पटकावले. तर भालाफेक F46 मध्ये देवेंद्र झंझारिया आणि सुंदर सिंग गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य पदक वा कांस्य पदकावर आपले नाव कोरले. तर दिवसांच्या शेवटी सुमीत अंतील याने भालाफेक F64 मध्ये सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. इतकेच नव्हे तर 68.55 मीटर इतक्या अंतरावर भालाफेकत विश्वविक्रमांची नोंद केली. यावेळी त्यांने तब्बल तीन वेळा विश्वविक्रम नोंदवला आहे.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात 7 पदकं जमा झाली आहेत. यामध्ये  दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे. दरम्यान, याआधी 2016 साली रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतानं चांगली कामगिरी केली होती. तेव्हा दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक भारताने पटकावले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: