शिक्षण हक्काची लढाई ही कार्यकर्त्यांची न राहता ,पालकांची व्हावी :प्रा सुभाष वारे

 

पुणे : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप,क्षेत्रसभा समर्थन मंच, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या संस्थांच्या वतीने ‘पालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा आणि सुधारणा ‘ या विषयावर सोमवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षण हक्काची लढाई ही कार्यकर्त्यांची न राहता ,पालकांची व्हावी,शिक्षणातील विषमता दूर व्हावी असा सूर या चर्चासत्रात व्यक्त झाला .

प्रा.सुभाष वारे, मुकुंद किर्दत यांनी मार्गदर्शन केले.३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता हा वेबिनार पार पडला.

मुकुंद किर्दत म्हणाले,’मानवी जीवनाचा स्तर उंचावण्याचे शिक्षण हे एकमेव साधन आहे.मोफत आणि दर्जेदार शिक्षण महात्मा फुले आणि गोखले यांनी पुढे आणली.आज ५३० हुन अधिक शाळा पुण्यात आहेत.पालकांच्या शाळेबाबत अपेक्षा पूर्ण होत नाहीत,म्हणून ते खासगी शाळांकडे वळतात.ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होऊ शकत नाही,हे लक्षात आले आहे.गणवेश,माध्यान्ह न्याहारी अशा खर्चाचा सरकारची बचत झाली,त्याचा ऑनलाईन शिक्षणात लाभ द्यायला हवा होता.पालकांचा खर्च शैक्षणिक सुविधांवरचा वाढला आहे.श्रीमंतांसाठी श्रीमंत शिक्षण व्यवस्था,गरिबांसाठी गरीब शिक्षण व्यवस्था अशी दुर्दैवी विभागणी झाली आहे.शाळांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे,याविषयावर न्यायालयात मांडणी झाली,त्यामुळे ,महाराष्ट्रात हा दिलासा मिळाला नाही महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यात पालकांना दिलासा मिळाला.राज्य सरकारच्या यंत्रणांना खासगी शाळांमध्ये प्रवेश सुद्धा दिला जात नाही.शिक्षणाचे दिल्ली मॉडेल डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.पण,महाराष्ट्र सरकारने तसे अद्याप केले पाहिजे.

प्रा.सुभाष वारे म्हणाले,’संविधानात शिक्षण हक्काचे मूळ कलम आणि आताचा कायदा वेगळा आहे.परंपरेने चालत आलेली सर्व प्रकारची विषमता संपविण्यासाठी चांगल्या शिक्षणाची संधी मिळावी हे संविधान कर्त्यांची भूमिका होती.दुर्दैवाने तसे न होता समांतर शिक्षण व्यवस्था उभ्या राहिल्या. भविष्यकाळात ज्या थोड्या फार नोकऱ्या,रोजगार संधी मिळणार,त्या खासगी शाळातील विद्यार्थ्यांना मिळणार की सरकारी शाळातील विद्यार्थ्यांना मिळणार हा प्रश्न आहे . विषमता राहणार की जाणार हा प्रश्न आहे. शिक्षण हक्क कायदा लॉटरी पुरता उरला आहे. शिक्षण हक्काची लढाई ही कार्यकर्त्यांची लढाई न राहता,पालकांची लढाई झाली पाहिजे.मंदिर उघडण्यासाठी आंदोलने होतात,पण शाळा उघडण्यासाठी राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत.

असलम इसाक बागवान यांनी सूत्रसंचालन केले.अल्लाउद्दीन शेख यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: