Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मुलांचे लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नाही – डॉ. समीर दलवाई

मुंबई : लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नसल्याचं चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तयारी शालेय विभागाने पूर्ण केल्यास शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

डॉ. समीर दलवाई म्हणाले, शाळा सुरू करण्याचा आणि लसीकरण सुरू होण्याचा कसलाच संबंध जोडता येणार नाही. हे दोन वेगळे मुद्दे आहेत. लशींचे आत्ताच क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत, त्यानंतर आता हे लसीकरण सुरू करतोय. कारण लहान मुलांनी लस घेतली की लगेच ती इम्युन होतील, असा त्याचा अर्थ काढू शकत नाही. लसीकरण हे लाँग टर्मसाठी महत्त्वाचे आहे.

मुलांना संसर्ग होऊन त्यांना त्रास होऊ नये याचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जातोय. शाळेत मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पालन करणे, शाळेत गर्दी होऊ नये यसाठी नियोजन करणे हे गरजेचं आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व अॅडल्ट आहेत त्यामुळे त्यांचे लसीकरण होणे गरजेच आहे. मुलांना कोविड झाला तर तो सौम्य असतो, प्रौढांना जर त्याचा संसर्ग झाला तो गंभीर स्वरूपाचा असतो. त्यामुळे प्रौढांचा लसीकरण व्हायला हवे.

शाळा सुरू करण्यापूर्वी सुद्धा काही मुले ऑनलाईन काही मुले ऑफलाईन असे हायब्रीड मॉडेलचा अवलंब करावा लागणारआहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना लहान मुलांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. कारण दीड वर्ष लहान मुलं ही घरात होती. शाळा जरी सुरू करण्यात येतील तेव्हा सुरुवातीच्या काळात अभ्यास एका अभ्यास न करता विद्यार्थ्यांचा सोशल रिहॅबिलिटेशन करणे गरजेचे आहे. मुलांना कुठलाही प्रकारची धोका नसणार अशा प्रकारची तयारी करूनच, शाळा सुरू करावे लागणार. शाळा सुरू करताना शिफ्टनुसार मुलांना शाळेत बोलवावे लागेल.

 

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading