पुणे जिल्ह्यात महा लसीकरण मोहिमेचे आयोजन

पुणे : बजाज ग्रुपने पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी महा लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे, ग्रामीण पुण्याच्या १३ तालुक्यांत हे लसीकरण संपन्न होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश पुणे ग्रामीणमधील दुर्गम भागांतील रहिवाशांना कोविड-१९ लस उपलब्ध करून देण्याचा आहे. कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी ही मोहीम हातात घेण्यात आली.

बजाज ग्रुप कंपन्या – बजाज ऑटो आणि बजाज फायनान्स लिमिटेडने जिल्हा परिषदेसोबत मिळून कोव्हीशिल्डच्या १.५ लाख डोसचे वाटप केले. ही लसीकरण मोहीम पुण्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा तालुक्यात आयोजित करण्यात येणार आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तिंचे लसीकरण यावेळी करण्यात येणार असून, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि व्याधिग्रस्त (को-मॉर्बिड) व्यक्तिंवर खास लक्ष असेल.

या उपक्रमाबद्दल बोलताना बजाज ग्रुपचे सीएसआर हेड पंकज बल्लभ म्हणाले की,“सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महासाथीत आपण सर्वांनी एकत्र येऊन देशातील सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा आणि जीवनाच्या अत्यावश्यक गरजांचा लाभ मिळतो आहे का याची खातरजमा करणे आवश्यक ठरते. मागील १३० वर्षांपासून बजाज ग्रुप समाज, सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या सोबतीनेसकारात्मक बदल घडविण्याकरिता ठामपणे उभा राहिला. कोविड-१९ च्या विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी प्रशासनाला साह्य करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: