fbpx

बांधकाम मजूरांसाठी मोफत लसीकरण मोहिमेला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत सुरुवात

पुणे : क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बांधकाम मजूरांच्या मोफत लसीकरण मोहिमेला आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. व्हीटीपी रिअल्टी यांच्या महाळुंगे येथील ब्लू वॉटर्स या बांधकाम प्रकल्पावर व्हीटीपी रिअल्टी, अॅक्ट ग्रँट व हकदर्शक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आज पहिल्या दिवशी या मोहिमे अंतर्गत अंदाजे ३ हजार ४०० बांधकाम मजुरांचे लसीकरण पार पडले. नजीकच्या भविष्यात शहरातील तब्बल ३५ हजार बांधकाम मजुरांचे लसीकरण या अंतर्गत हाती घेण्यात येणार आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, मनीष जैन, सचिव अरविंद जैन, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, व्हीटीपी रिअल्टीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व्ही टी पलरेशा, कार्यकारी संचालक निलेश पलरेशा, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी, संचालक संतोष जैन, उपाध्यक्ष रमाकांत शर्मा, अपोलो क्लिनिकचे विभागीय व्यवसाय प्रमुख बिकास अगरवाल, क्रेडाई पुणे मेट्रो – कामगार कल्याण समितीच्या समन्वयिका सपना राठी, समिती सदस्य मिलिंद तलाठी, पराग पाटील, लीना कुकरेजा, नवीन अगरवाल, क्रेडाई सदस्य अर्चना बडेरा, अनुप जमतानी व कमर्शियल क्झिक्युटिव्ह संतोष ताकभाते आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेडाई पुणे मेट्रोचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी यांनी केले

विक्रम कुमार म्हणाले की, शहराच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मितीमध्ये बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मजुरांचे लसीकरण होणे ही महत्त्वाची बाब आहे. क्रेडाईने हाती घेतलेल्या या मोहिमेला महानगरपालिका संपूर्णपणे पाठींबा देईल. शिवाय या मोहिमेसाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस व लसींचा पुरवठा करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू.

रणजीत नाईकनवरे म्हणाले, “कोविड काळात मजुरांच्या आरोग्य तपासणी बरोबरच मजुरांची अधिकृत नोंदणी, त्यांच्यासाठी लेबर कँपमध्ये आवश्यक सोयी, लहान मुलांसाठी क्रेश या बाबींवर क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने लक्ष देण्यात आले. याबरोबरच त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी आम्ही ही मोफत लसीकरण मोहीम हाती घेत आहोत. लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर इतक्या संख्येने मजुर घेऊन जाणे शक्य नसल्याने सरकारने बांधकाम प्रकल्पांवर लसीकरणाचे नियोजन करावे, अशी आमची मागणी आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: