कठीण काळात पैशापेक्षा मानसिक आधार महत्त्वाचा- राजाभाऊ मोरे

पुणे : समाजात हल्ली लोक स्वार्थासाठी काम करतात, निस्वार्थ सेवाभाव ठेवणारे कार्यकर्ते बोटावर मोजण्याएवढी पण शिल्लक राहिलेले नाही यांची खंत वाटते. अडचणी व कठीण काळात पैशापेक्षा मानसिक आधार हा महत्त्वाचा असतो. पैसा, संपत्ती संपली तरी मनात घर केलेली माणसांची साथ असेल तर पुन्हा विश्व जिंकायची ताकद आपल्या मिळते, हे सत्य ज्यांने अनुभवले तो आयुष्यात दुखी राहू शकत नाही अशी भावना मंडई विद्यापीठ कट्टावर गणेशभक्त राजाभाऊ मोरे यांनी व्यक्त केली.

तळागाळातील लोकांपासून ते जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात अग्रगण्य असलेला मंडई विद्यापीठ कट्टा; पुणे शहरातील अनेक गोष्टींना वाचा फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी गेल्या सात वर्षांपासून आजतागायत अडीच ते तीन हजार मान्यवरांना कट्टावर आमंत्रित केले आहे. त्याच क्रमात आज शनिवार कट्टावर शुन्यातून आयुष्य निर्माण करणारे व माणसाच्या मनात राज्य करणारे राजाभाऊ मोरे व त्यांच्या कुटुंबाला आमंत्रित केले होते. राजाभाऊ यांची ओळख एक गणेशभक्त, व्यवसायीक, समाजात वावरनारा समाज बंधू आणि व्हाईट हाऊस आदी अनेक उपमांनी लोक त्यांना संबोधतात. आज कट्टावर त्यांनी त्यांचा जीवन प्रवास, आयुष्यात अालेले चड उतार तसेच सुख-दुःखाच्या अनेक अनुभवांना उजाळा दिला. यावेळी सौ. नंदा राजाभाऊ मोरे त्यांचे सुपुत्र राकेश मोरे देखील उपस्थित होते. उपस्थित सर्वांचा यथोचित सन्मान सत्कार बाळासाहेब मालुसरे यांनी या प्रसंगी केला.

बाळासाहेब मालुसरे म्हणाले, मंडई विद्यापीठ कट्टा हे सर्वांसाठी खुले व्यासपीठ आहे. येथे विविध क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित केले जातात. कट्टावर चर्चा करण्यासाठी आजतागायत २५०० हून अधिक मान्यवर येऊन गेले. त्याच क्रमांत आज चर्चा करण्यासाठी गणेशभक्त, व्यवसायीक राजाभाऊ मोरे व त्याच्या कुटुंबाला आमंत्रित केले होते. जीवनातील चड उतार, व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी आदी संदर्भात मनसोक्तचर्चा आज झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: