डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला “ग्रीन चॅम्पियन पुरस्कार” प्रदान

पिंपरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने देशभरातून जिल्हा स्तरावर “एक जिल्हा, एक हरित विजेता” हा उपक्रम राबविण्यात आला. 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी पुणे जिल्ह्यामधून पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याची घोषणा ऑनलाईन माध्यमातून पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी केली.

महाराष्ट्रामधून एकूण 31 जिल्हात हा उपक्रम राबविण्यात आला पुणे जिल्ह्यातून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला “ग्रीन चॅम्पियन पुरस्कार” प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन माध्यमातून झाले विश्वस्त डॉ यशराज पाटील यांनी याचा स्वीकार केला. यावेळी अधिष्ठाता डॉ जितेंद्र एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच चव्हाण उपस्थित होते.

कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र- कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन जे पवार, सचिव डॉ सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव डॉ ए एन सूर्यकर यांनी या पुरस्कारासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कौतुक केले.

या उपक्रमांतर्गत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन आणि हरित व्यवस्थापन आदी घटकांचा मूल्यमापनात समावेश होता. राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जितेंद्र भवाळकर यांनी केले

“शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरण पूरक उपक्रमाकडे कल वाढविण्याच्या दृष्टीने त्याचा अभ्यासक्रमात समावेश करून एक जबाबदार नागरिक घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे” असे मत पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला “ग्रीन चॅम्पियन पुरस्कार” मिळाला आहे या बद्दल मनापासून अभिनंदन. समितीने केलेल्या मूल्यमापन आपण अग्रेसर ठरला आहात यातून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. गुणवत्ता टिकवण्याबरोबर नवनवीन सुधारणा कशा अंमलात आणता येतील हे मोठे आव्हान आपल्या समोर आहे तुमची स्पर्धा आता स्वतःशीच आहे. या उपक्रमामध्ये डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचा उत्कृष्टतेचा ध्यास यातून दिसून आला असे देशमुख यांनी सांगितले.

“आमच्या विद्यापीठाला “ग्रीन चॅम्पियन पुरस्कार” मिळणे ही फार अभिमानाची बाब आहे. पर्यावरण पूरक घटकांची अंमलबजावणी करीत आधुनिक ऊर्जा संसाधन वापरा बरोबर ऊर्जा बचतीला तसेच पर्यावरण जतन व संवर्धनाला प्रोत्साहन देत आहे हा पुरस्कार आज मिळाल्याने अधिकच आनंद होत आहे. मिळालेली ही कौतुकाची थाप अधिकच उत्साह वाढविणारी आहे. यातूनच पुढे काम करायला प्रोत्साहन मिळाले आहे. यासाठी सर्वांचेच योगदान फार महत्त्वाचे आहे” असे प्रतिपादन कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: