सातत्य राखून, निष्ठेने काम करणाऱ्यांनाच डावलले जात असल्याची काँग्रेस पक्षांध्यक्षांकडे तक्रार

पुणे : महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसची जंबो कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरवारी जाहीर केली. नवीन कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल झाल्याचे दिसून येत आहे, मात्र हे बदल करताना आगामी काळातील 18 महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेता कॉँग्रेसला मजबूत करण्यास प्रयत्नशील असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्वाची जबाबरदारी न देणे किंवा डावलले गेल्याची चर्चा राज्यात आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांच्याशी ‘महाराष्ट्र लोकमंच’संवाद साधला असता !“निष्क्रीय राहणे, घरात बसून राहणे” हे ‘मेरीट’ ठरते आहे..! असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जात असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले की, सोनियाजी व राहूलजींना कळकळीचे जाहीर आवाहन आहे की काँग्रेस वर निष्ठेने “काम करणाऱ्यांना” डावलले जात आहे..! स्व राजीव गांधीचे बोल आठवत आहेत.  ‘काँग्रेस को सत्ता के दलालोंसे बचाना चाहीए’… ! सोनियाजी व राहूलजींचे प्रतिनिधी म्हणूण वावरणारे त्यांची भूमिका चोख बजावत नाहीत…!
पर राज्यातील निरीक्षक येतात.. परंतू, त्यांची ‘जबाबदारी व ऊत्तरदायीत्व’ कुठेच निश्चित होत नाही..! त्यामुळे ते ही ‘पक्ष श्रेष्ठींच्या’ विश्वस्तांच्या भूमिकेत प्रामाणिकपणे रहात नाहीत…! त्यामुळे त्यांची मर्जी सांभाळणाऱ्यांची दखल घेतली जाते, मग तो खरोखर किती ‘क्रीयाशील व कार्यक्षम’ आहे हे बधीतले जात नाही..! प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांना पुरक व पोषक निर्णय होत आहेत.. याची आदरणीय पक्षाध्यक्षा व श्रेष्ठींनी तातडीने नोंद घ्यावी..!“निष्क्रीय राहणे, घरात बसून राहणे” हे ‘मेरीट’ ठरते आहे..! असा संदेश सामान्य कार्यकर्त्यांमध्ये जात आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विंश्वासात घेऊन कार्यकारीणी करणे गरजेचे होते व आहे.. तसे झालेले दिसत नाही .। सर्व सत्तेची पदे व मान सन्मान सोडून ‘पुर्णवेळ’ अध्यक्ष पदाची धूरा मा नाना पटोलेंनी स्वीकारली  त्याचे चीज व्हावयास हवे… त्यांना त्यांची टीम ठरवतांना विश्वासात घेणं गरजेचे आहे.. जेष्ठ नेते ‘पक्ष संधटनेच्या’ हितापेक्षा ही, व्यक्तीगत प्रेस्टीज… माझा माणूस .. अशा अविर्भावात आहेत.. मग त्यांचा माणूस’ खरोखर किती ‘सक्रीय वा निष्क्रीय आहे हे बधीतले जात नाही…!
आपण प्रथम पासूनच महात्मा गांधींच्या विचारांच्या काँग्रेस ला मानणारे आहोत.. नेहरू गांधी घराण्याच्या योगदाना बद्दल नितांत श्रध्दा, निष्ठा व आदर आहे.. व तो सदैव राहील.. आज पर्यंच्या आयुष्यात अनेक वर्षे पक्षात खर्च केल्यामुळे व सक्रीय निष्ठापुर्वक योगदान दिल्यामुळेच नैतिक अधिकार असल्यानेच “पक्ष हितासाठी” बोलत आहें..!
मतदार संघ, वॅार्ड, गल्ली वा चौकात ही जनाधार नसलेले नेते होऊ लागलेत… वर्षानु वर्षे इतरांना संधी नाहीच..? १०-१०, १५-१५ वर्षे प्रदेश सरचिटणीस / ऊपाध्यक्ष इ पदांवर काम करून विधानसभा लोकसभा लढून व त्या देखील पुन्हा मोठ्या मताधिक्याने हारून देखील .. जागा सोडायची नाही..?

Leave a Reply

%d bloggers like this: