शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे तर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवचरित्र घरोघरी पोहचविणारे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली असून. शनिवार दिनांक 28 ऑगस्ट 2021 रविवार दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी प्रत्येक विभागानुसार प्राथमिक फेरी घेतली जाणार असून प्रत्येक विभागातून चार उत्कृष्ट वक्ते निवडल्यानंतर शनिवार 4सप्टेंबर 2021 रोजी अंतिम स्पर्धा स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे, यामध्ये लाखोंची बक्षिसे पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत.

वयोगट 5 ते 17 मुले व मुली 18 पासून पुढे महिला व पुरुष अशी माहिती मोरे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, प्रवेश नोंदणीची तारीख 26 ऑगस्ट 2021 शेवटची आहे. शनिवार दिनांक 28 व रविवार 29 ऑगस्ट 2021रोजी त्या त्या विभागात प्राथमिक फेरी होणार आहे प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र भेटवस्तू व रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.
वक्तृत्व स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे
1) छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची रयते बाबतची कार्यपद्धती
2) छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांची युद्धनीती
3) शिवचरित्र मधील अनोळखी कथा कमी माहित असलेल्या
4) छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा प्रभाव तेव्हा पासून ते आजपर्यंत

Leave a Reply

%d bloggers like this: