fbpx

नारायण राणे यांना हायकोर्टात दिलासा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधान आणि अटकेप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये नारायण राणेंना कोर्टाने १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. १७ सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंविरोधात कोणतीही कारवाई करु शकत नाही असे निर्देश न्यालयाने दिले असल्याचे नारायण राणे यांचे वकिल सतिश मानशिंदे यांनी म्हटलं आहे. राणेंविरोधात जिथं जिथं गुन्हे दाखल झाले आहेत. तिथं जाण्याची गरज नसल्याचे राणेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २३ ऑगस्ट रोजी केलेलं वक्तव्य प्रक्षोभक नव्हतं असेही वकिल मानशिंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक पोलिसांनी २ सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे राणेंना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आजपर्यंत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. यापुढे कोणता गुन्हा दाखल करण्यात आला तर लगेच न्यायालयात धाव घेऊ असे नारायण राणे यांचे वकिल सतिश मानशिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच नारायण राणे यांनी यापुढे वादग्रस्त विधाने करावी की नाही याबाबत न्यायालयाने कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचेही वकिल मानशिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: