Big News – महापालिका निवडणुकीसाठी असणार एकसदस्यीय प्रभाग

पुणे: पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. राज्य सरकारने विधीमंडळात एकच प्रभाग असणार असा कायदा पारित केला होता. त्यानंतर 31 डिसेंबर 2019 रोजी पुणे, मुंबई महापालिकेसह राज्यातील 18 महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग असणार असे आदेश काढले आहेत.

राज्य सरकारने एकच प्रभाग केला असला तरी दोनच प्रभाग होण्याची शक्यता असल्याची चर्चा गेली अनेक महिने सुरू होती. एकच प्रभाग झाल्याने पक्षासह उमेदवाराच्या क्षमतेचाही कस लागणार आहे. पुणे महापालिकेत यापूर्वी २००७ एकच्या प्रभाग पद्धतीने निवडणूक झालेली होती.

महापालिकेचे निवडणूक अधिकारी अजित देशमुख म्हणाले, ‘शहरात एक प्रभाग एक सदस्य या पद्धतीने रचना केली आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पद्धतीने रचना केली जाईल. यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागेल. दोन प्रभाग असणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती अखेर याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून आगामी महापालिका निवडणुकासाठी एक सदस्यीय प्रभाग असणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: