टेल्को रस्त्यावरील कंटेनर पार्किंगमुळे नागरिकांना त्रास; स्वीकृत सदस्य दिनेश यादव, संतोष मोरे यांची कारवाईची मागणी

पिंपरी : जुन्या आरटीओ समोरील टेल्को रस्त्यावर कंटेनरचे बेकायदा पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

टेल्को रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला अवजड कंटेनर उभे केले जातात. बीआरटी मार्ग असलेल्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग केल्यामुळे पीएमपीएमएलची बसही या रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करुन वाहतूक सक्षम करावी, अशी मागणी दिनेश यादव यांनी केली आहे. यावेळी स्वि. सदस्य संतोष मोरे, प्रकाश चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: