‘स्कुल ऑफ आर्ट’ च्या नव्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे : महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्कूल ऑफ आर्ट’ तर्फे फाऊंडेशन कोर्स, आर्ट टीचर डिप्लोमा, जी.डी.आर्ट (पेंटींग), हॉबी क्लास,बेसिक फाऊंडेशन कोर्स, सर्टिफिकेट कोर्स इन कमर्शियल आर्ट,डिप्लोमा इन कमर्शियल आर्ट,एडव्हान्स डिप्लोमा इन कमर्शियल आर्ट या अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.
‘स्कूल ऑफ आर्ट’ च्या प्राचार्य हेमा जैन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.फाऊंडेशन कोर्स एक वर्षाचा,आर्ट टीचर डिप्लोमा दोन वर्षाचा,जी.डी.आर्ट ( पेंटींग ) हा चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे. फाऊंडेशन कोर्स, आर्ट टीचर डिप्लोमा,जी.डी.आर्ट (पेंटींग) हे अभ्यासक्रम कला संचालनालय आणि शासन मान्यताप्राप्त आहेत.

सर्टिफिकेट कोर्स इन कमर्शियल आर्ट,डिप्लोमा इन कमर्शियल आर्ट,एडव्हान्स डिप्लोमा इन कमर्शियल आर्ट हे ३ स्वायत्त पदविका अभ्यासक्रम आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने स्कुल ऑफ आर्ट मध्ये सुरु करण्यात येत आहेत. तसेच हॉबी क्लास हा ३ महिन्याचा तर बेसिक फाऊंडेशन कोर्स हा ६ महिन्यांचा अभ्यासक्रम देखील उपलब्ध करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी ८६९८२९८६२९ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: