विशेष पोलीस अधिका-यांचे काम पोलिसांप्रमाणे अधिक कर्तव्यदक्षतेने सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर

पुणे : कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासोबतच पोलिसांना मदतीकरीता येण्याचे काम विशेष पोलीस अधिकारी म्हणजेच एसपीओ करतात. पोलीस हे शासकीय नोकरी म्हणून कार्यरत असतात. मात्र, एसपीओ हे स्वत:हून जीवाची पर्वा न करता समाजासाठी काम करतात. त्यामुळे विशेष पोलीस अधिका-यांचे समाजाप्रती असलेले काम पोलिसांप्रमाणे अधिक कर्तव्यदक्षतेने केलेले दिसून येते, असे मत सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांनी व्यक्त केले.

पतित पावन संघटना आणि खडक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संकटकाळात उल्लेखनीय कार्य करणा-या  विशेष पोलीस अधिका-यांचा सन्मान खडक पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, विक्रम मिसाळ, आश्विनी पवार, सोमनाथ ढगे, सचिन माळी, पतित पावन संघटनेचे राजाभाऊ पाटील, मनोज नायर, स्वप्नील नाईक, दिनेश भिलारे, विश्वास मनेरे, श्रीकांत शिळीमकर, गोकुळ शेलार, धनंजय क्षीरसागर, मनोज पवार, विक्रम मराठे, सन्तोष शेंडगे, गुरु कोळी, योगेश वाडेकर, नरसिंग कोळी, राजाभाऊ राजपूत, सूरज पोटे, विश्वनाथ येमुल आदी उपस्थित होते.
सतिश गोवेकर म्हणाले, कोविड काळात ज्याप्रमाणे पोलीस अहोरात्र रस्त्यावर होते. त्यांच्यासोबत किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त काम एसपीओंनी केले आहे. त्यामुळे भविष्यात देखील कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी पोलिसांच्या मदतीला सर्व एसपीओ येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्रीहरि बहिरट म्हणाले, कोविड काळात सर्वच स्तरातून माणुसकीचे दर्शन पहायला मिळाले. एसपीओ देखील यावेळी मदतीला धावून आले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या अडचणी दूर करण्याकरीता एसपीओ झटले असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वप्नील नाईक म्हणाले, शहराच्या पूर्व भागात कोविड व लॉकडाऊन काळात मोठया प्रमाणात पत्रे लावण्यात आले होते. त्यावेळी एसपीओंनी महत्वाची भूमिका बजावत काम केले. समाजाप्रती असलेले कर्तव्य समजून त्यांनी केलेले कार्य असून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरीता या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: