डॉ. संगीता घोडके यांचा सेवा सन्मान पुरस्काराने गौरव   

पुणे : डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च संस्थेमधील शिक्षक व विद्यार्थी यांच्या रोटरॅक्ट क्लब ऑफ युनिटेकच्या वतीने डॉ. संगीता घोडके यांना नुकतेच सेवा सन्मान पुरस्कार देत गौरविण्यात आले. मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इंग्रजी साहित्याच्या सर्वोत्कृष्ट प्राध्यापिका म्हणून विद्यार्थ्यांच्या वतीने प्रो. घोडके यांची निवड करण्यात आली. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च येथे सदर कार्यक्रम पार पडला.

क्लबचे अध्यक्ष सॅम्युअल पवार, सचिव निकिता येवलकर व सल्लागार अभिजित पाटील आदी मान्यवरांच्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सांगवी येथील बी. आर. घोलप महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख म्हणून प्रो. घोडके या कार्यरत आहेत. इंग्रजी साहित्यातील सर्वोत्कृष्ट प्राध्यापिका याबरोबरच आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: