fbpx

श्रेयस सारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं – प्रार्थना बेहरे


माझी तुझी रेशीमगाठ हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. प्रोमोज रिलीज झाल्यापासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा हि चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेतून प्रार्थनाने मराठी टेलिव्हिजन माध्यमात पदार्पण केलं त्यानिमित्ताने तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. श्रेयस तळपदे यांच्या सोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे?
– श्रेयस सारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं. त्यांच्यासोबत चित्रपटात भूमिका मिळावी अशी माझी आंतरिक इच्छा होती. पण मालिकेत सहकलाकार आणि त्यातही प्रेमाच्या संवेदनशील गोष्टीवर हि मालिका आहे त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली.
२. टेलिव्हिजन वर पदार्पण करताना काय भावना होती?
– मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. आपले चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. म्हणून मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचा निर्णय घेतला आणि हि मालिका स्वीकारली.
३. मालिकेचं शूटिंग बऱ्याच काळानंतर करताना कसा अनुभव येतोय?
– मी अनेक वर्षांनंतर मालिका करत आहे त्यामुळे दिग्दर्शकांना मी मला नवीन कलाकाराप्रमाणे वागणूक देण्यासाठी बजावलं आहे कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.
४. तुझ्या भूमिके बद्दल काय सांगशील?
– मी नेहा कामत हि व्यक्तिरेखा या मालिकेत साकारतेय. नेहा हि खूप साधी-सरळ आहे. ती आणि तिची मुलगी परी यांचं एक छोटंसं जग आहे आणि या त्यांच्या जगात जेव्हा यशवर्धनची एंट्री होते तेव्हा त्यात काय भावनिक बदल होतो हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.
५. मायरा सोबत शूटिंग करताना किती धमाल असते सेटवर?
मायरा खूपच लहान आहे आणि तितकीच निरागस आहे. ती फारच गोड आणि बिनधास्त आहे, तिला कसलीच भीती वाटत नाही आणि कॅमेराची तर मुळीच नाही. ती तिला दिलेले डायलॉग्स एकदम चोख बोलते आणि खूप छान परफॉर्म करते. ऍक्टिंग न करता ऍक्टिंग कशी करावी हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: