गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या पटवर्धनबाग येथील गुरुस्पर्श या निवासी प्रकल्पाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन  

पुणे : शहरातील मोक्याच्या जागी निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती व जुन्या इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या पटवर्धनबाग येथील ‘गुरुस्पर्श’ या निवासी प्रकल्पाचे भूमिपूजन आज भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी विभाग प्रमुख सुशील जाधव, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि सोमनाथ तेंडूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना पाटील म्हणाले, “आज पुण्यासारख्या शहरात बाहेरून येऊन स्थायिक होणा-यांची संख्या मोठी आहे, शिवाय कोरोना नंतर घरे घेण्यासाठी नागरिक देखील उत्सुक आहेत, या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित योजना देणा-या गोखले कन्स्ट्रक्शन्स सारख्या बांधकाम व्यवसायिकांची गरज आहे. आजवर यांच्या वतीने ४५ लाख स्केअर फूटाचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच ते साडे चार कोटी स्केअर फूट बांधकाम पूर्ण करून विक्रम रचतील असा माझा विश्वास आहे.”

१५ वर्षांपूर्वी वाळू विक्रीच्या व्यवसायापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज एका उंचीवर पोहोचला आहे. २००८ मध्ये पहिला प्रकल्प पूर्ण केल्यानंतर आजवर संस्थेने १७६ प्रकल्प पूर्ण केले असून सध्या ४० प्रकल्पांचे काम सुरु आहे. गुणवत्तेसोबतच प्रकल्पाचा वेळेवर ताबा देणे अशी ग्राहकांमध्ये आपली ओळख असल्याचे विशाल गोखले यांनी सांगितले. पटवर्धनबाग येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या गुरुस्पर्श या निवासी प्रकल्पामध्ये २० सदनिका असल्याची माहिती देखील गोखले यांनी या वेळी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: