fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

BIG BREAKING – केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी केली अटक

रत्नागिरी – महाराष्ट्राच्या राजकारणात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू होती या यात्रे दारम्यानच पोलिसांनी गोळावली येथे राणे यांना ताब्यात घेतले आहे.

यावेळी आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार यांच्यासह राणे यांची मुले नीलेश राणे आणि नितेश राणे ही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याचं वृत्त समोर येत आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading