नारायण राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा आम्हाला संशय – प्रसाद लाड

संगमेश्वर – नारायण राणे यांना जेवताना पोलिसांनी खेचले, एका केंद्रीय मंत्रयासोबत केलेला व्यवहार निषेधार्ह आहे. आम्हाला अशी भीती आहे की राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे असे मत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राणे यांच्या अटकेनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान, राणे यांच्या अटकेसाठी  एका मंत्र्यांचा दबाव असल्याचे सांगत पोलिस सुद्धा हे मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच राणे यांना जेवण करू दिले नाही, त्यांची योग्य वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही असेही त्यांनी सांगितले. राणे यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याचेही लाड यांनी सांगितले.

तसेच, नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी राणे यांचा रक्तदाब वाढला असून त्यांची शुगर आता तपासता आली नसल्याचे प्रसारमाध्यमाशी बोलताना  सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: