येस बँक आणि व्हील्सईएमआय यांच्यात दुचाकी कर्जांसाठी सह- कर्जपुरवठा भागिदारी

मुंबई : येस बँक आणि व्हील्सईमआय प्रा. लि. यांनी स्पर्धात्मक व्याजदरात दुचाकी कर्ज पुरवण्यासाठी सह- कर्जपुरवठा करार केला आहे. या भागिदारीच्या माध्यमातून आपापल्या क्षमतांचे एकत्रीकरण करून भारतातील दुचाकी ग्राहकांना कर्ज घेण्याचा प्रभावी व सुरळीत अनुभव देण्याचा उद्देश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तयार केलेल्या सह- कर्ज आराखड्यामुळे सहकार्य करण्याचे चांगले माध्यम उपलब्ध झाले असून त्याला बँकेच्या कमी खर्चिक निधीचा तसेच एनबीएफसीमधील सोर्सिंग व सर्व्हिसिंग कौशल्याचा लाभ होतो. या भागिदारीमध्ये दोन्ही कर्जपुरवठादारांच्या बलस्थानांचा समतोल साधण्यात आला असून त्यामुळे ही भागिदारी सर्व घटकधारकांसाठी लाभदायक ठरली आहे तसेच पर्यायाने वंचित बाजारपेठांमध्ये विस्तारण्यात मदतही झाली आहे.

व्हील्सईएमायतर्फे दुचाकी मालकी- ती चालवण्याच्या जीवनचक्रादरम्यान परवडणाऱ्या विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात, ज्यामुळे नोकरदार कुटुंबांसाठी प्रवास परवडणारा होतो. यामध्ये नव्या आणि जुन्या दुचाकींसाठी कर्ज देणे, इलेक्ट्रिक बाइक्स उपलब्ध करून देणे, विमा, सर्व्हिसिंग, सुट्या भागांचे व्यवस्थापन आणि जुन्या दुचाकींसाठी पारदर्शक बाजारपेठ यांचा समावेश असतो. व्हील्सईएमआयकडे त्यांच्या अनोख्या मॉडेलच्या माध्यमातून दुर्गम भागातील ग्राहकांना वित्त पुरवठा करण्याचा चांगला अनुभव असून त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील डिजिटल दरी सांधली जाते व वंचित ग्राहकवर्गापर्यंत प्रवासाच्या सोयी पोहोचवल्या जातात.

या भागिदारीअंतर्गत दोन्ही कर्जपुरवठादारांनी पहिल्या टप्प्यात 1 लाख दुचाकींना वित्तपुरवठा करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे.

येस बँकेच्या रिटेल बँकिंग विभागाचे जागतिक प्रमुख राजन पेंटल म्हणाले, ‘व्हील्सईएमआयबरोबर भागिदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या भागिदारीमुळे बँकेला नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे व तिथे आपले अस्तित्व रूजवणे शक्य होणार आहे. ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांचील व्हील्सईएमआयच्या बलस्थानांचा लाभ करून घेत या भागिदारीद्वारे नफा देणारा तसेच शाश्वत दुचाकी कर्ज पोर्टफोलिओ उभारण्,
आम्ही उत्सुक आहोत.’

 व्हील्सईएमआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास कांथेती म्हणाले, ‘दुचाकी क्षेत्रात बऱ्याच संधी आहेत आणि येस बँकेशी भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागिदारीमुळे आमची गुंतवणूक, व्याप्ती विस्तारली जाईल तसेच बँकेसाठी दर्जेदार ग्राहकवर्ग तयार होईल.’

Leave a Reply

%d bloggers like this: