fbpx

महिंद्रा तर्फे पिकअप्स आणि छोट्या व्यावसायिक वाहनांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भागीदारीत विशेष आर्थिक योजना सादर

मुंबई : भारतातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादन कंपनी असणाऱ्या आणि तीन चाकी वाहनांपासून ५५ टन एचसीव्ही ट्रक्स पर्यंत विविध प्रकारची उत्पादने आणि सुविधा पुरविणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. महिंद्रा अँड महिंद्राची छोटी व्यावसायिक वाहने आणि पीकअप्सच्या खरेदीवर या सामंजस्य करारातून विशेष आर्थिक मदत मिळणार आहे. त्यात सर्वोत्तम व्याज दर आणि कर्ज कालावधी आहे. एसबीआयच्या कॉन्टॅक्टलेस लेंडिंग प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाने पुढे जाऊन एकवाक्यता, पारदर्शकता यांची खात्री दिली असून कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधीही कमी केला आहे. यामुळे ग्राहकांच्या कॅशफ्लो मध्येही लवचिकता येईल आणि सप्रो प्रॉफीट ट्रक अँड जितो आणि पिकअप उत्पादन मालिकेत कॉन्टॅक्टलेस मालकी अनुभव घेता येईल त्यायोगे महिंद्रा वाहनांची मालकी सुरक्षित आणि परवडणारी ठरेल.

 या घोषणेसंदर्भात बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजन एससीव्हीचे व्यवसाय प्रमुख अमित सगर म्हणाले, “सर्वोत्तम ग्राहक अनुभव आणि सेवा पुरविण्याच्या आमच्या कामात आम्ही सदैव आमच्या ग्राहकांना आनंद देणाऱ्या योजना सादर करण्याच्या प्रयत्नांत असतो. आमची आर्थिक योजना केवळ वैशिष्ट्यपूर्ण आहे असे नाही तर अत्यंत समर्पकही आहे. जोडीला एसबीआयची देशभर असलेली पोहोच आणि विश्वास आहे. ही योजना आमच्या एससीव्ही आणि पिकअप ग्राहकांना आत्मविश्वास देत प्रेरणा देईल आणि त्यांना प्रगती करण्यासाठी मदत करेल.”

 एसबीआय बरोबरच्या सहकार्याने महिंद्रा अँड महिंद्राच्या छोट्या व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस आणि अडथळामुक्त पद्धतीने केवळ ५९ मिनिटात कर्ज मंजुरी प्रक्रिया पार पडेल. यामुळे ग्राहकांना (३.४५ लाख रुपये कर्जापर्यंतच्या रकमेसाठी) ६६६६ रुपये इतक्या कमी किंमतीतल्या इएमआयसह सर्वोत्तम उत्पादन खरेदी करता येईल आणि त्यासाठी व्याजदरही कमी म्हणजे ११.५% असेल. यामध्ये ग्राहकांना कर्जाचा कालावधीही ६ वर्षांपर्यंत वाढविण्याची लवचिकता आहे. त्यामध्ये एक महिन्याचा कर्ज हप्ता भरायला स्थगिती कालावधीही आहे. ग्राहक रोड फंडिंग वर ८५% पर्यंत जास्तीच्या कर्ज रकमेचीही ग्राहक निवड करू शकतात. त्यासाठी थर्ड पार्टी हमीदार असण्याची गरज नाही. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांसह छोटे रस्ते वाहतूकदार आणि छोट्या व्यावसायिक वाहनांसाठीचे प्रथम खरेदीदार यांनाही एसबीआय बरोबरच्या महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन वित्तीय योजनेचा फायदा घेता येऊ शकतो.

Leave a Reply

%d bloggers like this: