मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत चावरे तर सचिवपदी प्रा. तुषार क्षीरसागर यांची निवड

पुणे : भिगवन येथील मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत चावरे यांच तर सचिवपदी प्रा. तुषार क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी पुढील दोन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

येथील मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पिसाळ यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रशांत चवरे यांची तर सचिव पदी प्रा. तुषार क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.यावेळी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. पदग्रहण समारंभासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, इंदापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजुकमार थोरात, तानाजी काळे, नारायण मोरे,प्रदीप तरंगे, हरिदास वाघमोडे उपस्थित होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने म्हणाले, पत्रकार पत्रकारितेमध्ये समाजाला विधायक दिशने घेऊन जाण्याची क्षमता असते. येथील मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून विधायक कामांचा वस्तुपाठ समाजासमोर ठेवला जाईल. इंदापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार थोरात म्हणाले,पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक आव्हाने निर्माण झाली आहे त्यांना समारे जाण्यासाठी पत्रकारांनी योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःला आभुषित करावे.प्रास्ताविक प्रा. तुषार क्षीरसागर यांनी, सुत्रसंचालन योगेश
चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन विजय गायकवाड यांनी केले.

नुतन कार्यकारिणी  उपाध्यक्ष विठ्ठल मोघे(दौंड विभाग) विजय गायकवाड(इंदापुर विभाग), सहसचिव महेंद्र काळे,खजिनदार आकाश पवार, संघटक डॉ. सुरेंद्र शिरसट, गणेश चोपडे, समन्वयक संतोष सोनवणे, जेष्ठ संचालक तानाजी काळे, नारायण मोरे, सुरेश पिसाळ, अप्पासाहेब मेंगावडे,बाळासाहेब तांबे, गणेश जराड,  युवा संचालक सचिन लोंढे, अतुल काळदाते, अप्पासाहेब गायकवाड, विजयकुमार गायकवाड,निलेश चांदगुडे,निलेश गायकवाड, सागर घरत, सागर जगदाळे, शैलेश परकाळे,सचिन राजेभोसले, नवनाथ सावंत,अमित सुतार, इरफान तांबोळी, शैलैश परकाळे या कार्यक्रमास उपस्थित होते .

Leave a Reply

%d bloggers like this: