दहीहंडीला परवानगी द्या, नाहीतर आंदोलन करणार – आशिष शेलार

सोलापूर :दहीहंडीला परवानगी न मिळाल्यास राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप आमदार आशिष शेलारांचा दिला. त्यांच्या या इशाऱ्यामुळे दहीहंडीच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापणार आहे ते आज सोलापूरच्या दोऱ्यावर आले होते.

आशिष शेलार म्हणाले की, दहीहंडी उत्सव कोरोनाच्या कारणामुळे करू नका अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीसाठी फोन केला आहे. दोन डोस घेतलेले, प्रमाणपत्र असलेले लोक सहभागी होतील. तसेच, दहीहंडीचे थर जास्त नसतील याची काळजी घेऊन हा पारंपरिक सण साजरा करू द्या. अशी विनंती केली आहे. परंतु, या विनंतीनंतरही दहीहंडीला परवाणगी दिली नाही, तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: