fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

संघटीत आणि असंघटित महिला कामगारासाठी लसीकरणाची शिबिरे भरवणार – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : डॉ.नीलम गोऱ्हे (उपसभापती विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य) यांनी महाराष्ट्रातील तमाम भाऊ -बहिणींना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच या पवित्र सणानिमित्त वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमाची माहिती दिली. उपक्रमात प्रमुख्याने स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून संघटीत आणि असंघटित महिला कामगारांना लसीकरणाची शिबिरे भरवण्यात येणार, प्राथमीक स्तरावर मुंबई, पुणे आणि संभाजी नगर मध्ये पुढच्या आठवड्यापासून हे शिबिर सुरू होणार.

‘स्वयंसिद्धा भाग दोन’ या कार्यक्रमाची देखील घोषणा त्यांनी केली. यामध्ये कोरोना मुळे निराधार झालेल्या महिलांना अपेक्षित असलेल्या मदतीचे सर्वेक्षण करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. या कामात आपर्णा पाठक, झेलम जोशी या समन्वयक म्हणून तर फरिदा लांबे, मेधा कुलकर्णी, मृणालिनी जोग आदींचे सहकार्य असेल असेही त्या म्हणाल्या.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कामगार सेनेच्या माध्यमातून हजारोंना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या संसाराला मोलाची साथ देत असलेले शिवसेना उपनेते, रघुनाथ कुचिक यांना आज रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधली. गोऱ्हे यांनी औक्षणाचं ताट सजवून त्याचं औक्षण केल, हातात राखी बांधून मिठाई दिली तसेच शाल भेट देऊन सत्कार केला. आजच्या पवित्र मणीबंधनाची भेट म्हणून कुचीक यांनी त्यांच्या संकल्पनेतून प्रकाशित केलेल्या शिवसेना; अस्मिता-संघर्ष -वाटचाल पुस्तक नीलमताई यांनी भेट दिले.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी भगवान श्री कृष्ण आणि देवी द्रौपदी यांच्या पवित्र रक्षा सुत्राचे स्मरण करून आजच्या सैन्य दलात, पोलीस खात्यात, एन.डी.ए या सोबत विवीध सुरक्षा दलाच्या माध्यमातून तमाम रक्षणकर्ता भाऊ बहिणीचे देखील आभार मानले. आणि विघ्नहर्ता गणराया कडे सर्वाच्या आरोग्याची प्रार्थना केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading