fbpx

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जागरण गोंधळ

पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट चौक येथे मोदी सरकारविरोधी जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल , गँस इंधन दरवाढ, वाभती बेरोजगारी, जीवनावश्यक गोष्टींची महागाई यासाठी जनतेला “बुरे दिन” दाखवणाऱ्या मोदी सरकारला दाखवून देण्यासाठी हा जागरण गोंधळ घालण्यात आला. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ , नगरसेवक प्रदीप गायकवाड, नगरसेविका स्मिता कोंढरे, नगरसेविका अश्विनी भागवत आणि सर्व राष्ट्रवादी महिला विधानसभा अध्यक्षा तसेच शहर महिला पदाधिकारी आणि असंख्य महिला कार्यकर्त्यां यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: