fbpx

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या कार्यालयाचे उदघाटन

पुणे : आत्मनिर्भर युवक अभियान, शिका व कमवा उपक्रम, युवक, महिला नागरिकांसाठी स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणे यासोबतच सामाजिक समस्यांवर प्रामाणिकपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते घडविण्याचा संकल्प करीत आणि युथ फॉर नेशनचा नारा देत सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला. 

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यालयाचे उद्घाटन धायरी येथे संपन्न झाले, यावेळी सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. जाणीव सामाजिक संस्थेचे रविन्द्र चव्हाण, विजय वरुडकर, डॉ. आशिष पोलकडे, आचार्य गोरक्षनाथ घाडगे महाराज, रवींद्र वाघोले, जगदीश गजऋषी, जयदीप बंदावणे, सागर पाटील, चेतन मराठे, विशाल वरुडकर, ज्योत्स्ना वरुडकर, गोरख जाधव, मंगल नागुल, केदार गजऋषी उपस्थित होते.

विजय वरुडकर म्हणाले, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समुह म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या नागरिकांची संघटना आहे. सामाजिक समस्यांवर प्रामाणिकपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते घडवणे हेच संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 
संस्थेच्या वतीने येत्या काळात आरोग्य संस्कार उपक्रम, कृषी उद्योग सक्षमीकरण, डिजिटल साक्षरता उपक्रम, रोजगार निर्मिती, अनाथ आश्रम, दिव्यांग शाळा, वृध्दाश्रम सहयोगी उपक्रम,समाजातील विविध अनाथ आश्रम,दिव्यांग शाळा, वृध्दाश्रम, आदिवासी शाळा, गरजू विद्यार्थ्यांना सहयोगी उपक्रम राबवणे, पर्यावरण संवर्धन व कचरा व्यवस्थापन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: