मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

आंनद गोयल यांच्या पुढाकारातून पुणेकरांच्या सेवेत तीन रुग्णवाहिका

मुंबई : आरोग्य व्यवस्थेत हातभार लावण्यासाठी शिवसैनिकांनी राज्यात मोठ्या प्रमाणात काम केले. आंनद गोयल आणि शांताराम आबा खलसे यांच्या पुढाकाराने पुणे शहरासाठी तीन रुग्णवाहिका सुरू केल्या. रुग्णवाहिकांचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यासाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, शंकर संगम, शशी देवकर, अमर धोत्रे, आदी उपस्थित होते. उपस्थितीच्या वतिने देवी सरस्वतीची मुर्ती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार यावेळी केला गेला.

एकंदरीत कोरोना महामारीच्या परिस्थितीत अनेक रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या आणि त्यामुळे अनेकांचे नाहक प्राण देखील गेले. परंतु नागरीकांची दुरावस्था पुन्हा अशी होऊ नये म्हणून यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख आंनद गोयल आणि विभाग प्रमुख शांताराम आबा खलसे यांच्या स्व खर्चातून या तीन रुग्णवाहिका पुणे शहरातील नागरिकांसाठी मोफत सुरू करण्यात आल्या आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, व्यक्तीगत आणि सरकार पातळीवर दोन्ही प्रकारे जनतेची सेवा करण्याचे काम हे सरकार करत आहे. आंनद त्यांच्या सर्व सहकार्यांनी स्वतःच्या खर्चातून या रुग्णवाहिका तैयार केल्या असून गरजूंपर्यंत त्या कुटुंबा प्रमाणे धाऊन जातील यांची मला खात्री आहे. या सोबतच त्यांनी रुग्णवाहिकेचा कमीत कमी वापर होऊन लवकर हे संकट नाहीस ह्वावे यासाठी प्रार्थना केली.

रविंद्र मिर्लेकर म्हणाले, या कठीण काळात रुग्णवाहिकांची आवश्यकता किती मोठी आहे हे लक्षात घेऊन हे सेवा सुरू करण्यात आली आहे. कोव्हिड सेंटर, रक्तदान शिबीरे, गरजूंना मदताचे अनेक काम पुण्यातील शिवसैनिकांनी केले आहे. त्याच सेवेत भर देत रुग्णांना दवाखाना नेण्यासाठी रुग्णवाहिका आजपासून योग्य सेवा देतील याची खात्री मला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: