fbpx

कॅम्प एज्युकेशन सोसायटीने साजरा केला लीला पुनावाला फाउंडेशनचा रौप्यमहोत्सव

पुणे: लीला पुनावाला फाऊंडेशन (एलपीएफ) ने आज आपल्या २५ वर्षांच्या यशस्वी व अभुतपुर्व प्रवासाचा रौप्यमोहत्सव साजरा केला, यासाठी आयोजीत कार्यक्रमामध्ये वालचंद संचेती (सीईएसचे अध्यक्ष) यांनी एलपीएफच्या अध्यक्षा लीला पुनावाला यांनां सन्मानित करत कार्यक्रमाची सुरुवात केली.

एलपीएफ ने अडीच दशकांच्या प्रवासात जवळपास ११००० मुलींचे जीवन बदलले आहे, एलपीएफद्वारे शिष्यवृत्ती प्राप्त करणार्या या मुलींना फाऊंडेशन ने शैक्षणिक व्यावसायिक साक्षरते सोबतच , तांत्रिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सशक्त बनवले आहे, आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे जो त्यांना आर्थिकरित्या स्वतंत्र व सक्षम बनवण्यात मदत करतो. या रौप्य मोहत्सवावेळी लीला पुनावाला फाऊंडेशन च्या मुलींना अनोख्या ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. शालेय प्रकल्प टूमारो टुगेदरच्या ४० लीला ज्युनियर्स आणि सिनियर्सना एसएससी आणि एचएससी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. यावेळी बोर्डातील टॉपर्सना एलपीएफ कडून स्मार्ट फोन देखील भेट म्हणून देण्यात आले,  यानंतर फाऊंडेशनच्या मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक महिन्याचे अन्न धान्य आणि इतर आवश्यक किराणा देखील देण्यात आला.

हा उपक्रम विशेषतः एलपीएफ चे संस्थापक विश्वस्त फिरोज पुनावाला यांनी आयोजित केला होता.

कुटुंब, मित्रपरिवार आणि कॉर्पोरेट भागीदारांच्या पाठिंब्याने पुनावाला यांनी एकट्याने या उपक्रमाचे नेतृत्व केले आहे. आपल्या वयोमानाकडे दुर्लक्ष करत कोविड -१९ महामारीत देखील त्यांनी हा मदतीचा ओघ धीमा होऊ दिला नाही. फिरोज पुनावाला यांनी या उपक्रमाद्वारे लीला पुनावाला फाऊंडेशनच्या मुलींच्या ३,३०० हून अधिक कुटुंबांना मदत केली आहे. या कार्यक्रमात एलपीएफ विश्वस्त आणि सीईएस समिती सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.

यात मुख्य अतिथी होते वालचंद संचेती (अध्यक्ष, सीईएस) आणि पद्मश्री लीला पूनावाला (अध्यक्षा-एलपीएफ, पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्ता- १९८९ आणि कमांडर १ फस्ट क्लास रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार २०१९ स्वीडन) .या कार्यक्रमासाठी फिरोज पुनावाला (संस्थापक विश्वस्त, एलपीएफ), प्रीती खरे (सीईओ, एलपीएफ), एलपीएफ विश्वस्त मंडळ आणि सीईएस समिती सदस्य देखील उपस्थित होते. या समारोहामध्ये चार महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना एकत्र आणले गेले. एलपीएफने कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वालचंद संचेती यांना त्यांच्या आजीवन सामाजिक कार्यासाठी सन्मानित केले. दुसरे म्हणजे, या कार्यक्रमात पद्मश्री लीला पुनावाला यांना अभूतपूर्व प्रवासाची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल एलपीएफच्या अध्यक्षा म्हणून सन्मानित केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: