Wednesday, November 18, 2026
BusinessLatest NewsLIFESTYLE

रिलायन्स ज्वेल्स’ तर्फे 14 व्या वर्धापन दिनानिमित्त “आभार” कलेक्शन सादर 

मुंबई: सालाबादप्रमाणे यंदाही रिलायन्स ज्वेल्स’ तर्फे 14 व्या वर्षापूर्तीचे निमित्त साधून “आभार” या ज्वेलरी कलेक्शनची विस्तारित श्रेणी प्रस्तूत करण्यात आली आहे. #RishtonKaDhaga या संकल्पनेतून आपले ग्राहक, कर्मचारी आणि कारागीर यांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करणे हा यामागचा एकमेव उद्देश आहे. यंदाचे हे नवीन कलेक्षण तरकशी, मॅक्राम आणि विणकाम यापासून प्रेरित आहे. जो धागा प्रेम, विश्वास आणि एकतेचे प्रतिक आहे.

या कलेक्षणचे वैशिष्ट्य म्हणजे हस्तकला कुसर करण्यात आलेल्या सोने आणि हिऱ्यांच्या कानातील दागिन्यांच्या सुबक अशा डिझाईन्स; यामध्ये फुलांच्या गुच्छेदार, नक्षीदार, टॉप अँड ड्रॉप, लटकन, झुमके, कुड्या आणि चांदबाली अशा पारंपरिक आणि समकालीन डिझाईन्स समाविष्ट आहेत.


नवीन कानातील दागिन्यांचे नाविन्यपूर्ण कलेक्शन सादर करण्याव्यतिरिक्त रिलायन्स ज्वेल्सने 30 जुलै ते 1 सप्टेंबर दरम्यान खास वर्षपूर्ती ऑफरची घोषणा केली आहे, ज्यामध्ये सोने दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किंमतीवर 20 % ची सवलत राहील.

एकंदर प्रक्रियेमागील दूरदृष्टी आणि विचार प्रक्रियेविषयी बोलताना, आभार कलेक्शन #RishtonKaDhaga या संकल्पनेभोवती फिरत असल्याचे सांगण्यात आले. आभार आणि त्याची संकल्पना “जिसने हमे आप से और आपको हमसे बांध रखा है”, “जो हुनर और प्यार को एक तार से जोडता है” (ज्याने आम्हाला तुमच्याशी आणि तुम्हाला आमच्यासोबत बांधून ठेवले आहे”, “जी कौशल्य आणि प्रेमाला एका तारेने जोडते) या टॅगलाईनवर आधारलेली आहे. ब्रँडवरील विश्वास दृढ राहण्याच्या दृष्टीने आमच्या सर्व सहयोगींचे आभार व्यक्त करण्याकडे रिलायन्स ज्वेल्सचे ध्येय आहे. त्याउपर अद्वितीय दागिने घडविण्याच्या दिशेने हा ब्रँड प्रेरित आहे. #RishtonKaDhaga हे एक मल्टीमीडिया कॅम्पेन असून त्यावर 1 मिनिटांची सुंदर फिल्म तयार करण्यात आली आहे. 

या कलेक्शन आणि #RishtonKaDhaga विषयी बोलताना, रिलायन्स ज्वेल्सचे सीईओ श्री. सुनील नायक म्हणाले की, “हे कलेक्शन आणि कॅम्पेन यांच्या माध्यमातून इतक्या वर्षांत आम्हाला साह्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. तरकशी या मॅक्राम आणि विणकामाने प्रेरित आभार कलेक्शन प्रक्षेपणाच्या माध्यमातून अधिकाधिक विश्वास आणि प्रेम दृढ करण्याकडे आमचा कल आहे. अतिशय प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेने गुंफलेल्या सुंदर कलेक्शनचा अनुभव आमच्या ग्राहकांना नक्की आवडेल ही इच्छा व्यक्त करतो.”

Leave a Reply