fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

टीसीएलने डिजिटल डिस्प्लेसह वॉशिंग मशीनची नवी श्रेणी लाँच केली

मुंबई: टीसीएल इलेक्ट्रॉनिक्स, या जागतिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सेगमेंटमधील आ‌घाडीवरील व वेगाने वृद्धी करणाऱ्या कंपनीने फ्लिपकार्टवर वॉशिंग मशीन्सची नवी श्रेणी लाँच केली. नूतनाविष्कार आणि तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या टीसीएल ब्रँडने लाँड्रीचा अद्वितीय अनुभव देण्यासाठी नव्या वॉशिंग मशीन्स तयार केल्या आहेत. टीसीएलच्या नव्या वॉशिंग मशीन्स तीन रंग आणि आकारात १५,९९९ रुपये अशा सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध आहेत.

यात ऑटो एरर डायग्नोसिस टेक्नोलॉजी असून याद्वारे आपोआप बिघाडाचे निदान होते आणि संभाव्य कारणे आणि दुरुस्तीची पद्धतही डिस्प्लेवर दर्शवली जाते. डिजिटल डिस्प्लेद्वारे ग्राहकांना वॉश टायमर समजणे आणि सेट करणे सोपे जाते. तसेच यूझरला काही वेळ धुणे थांबवून नंतर हव्या त्या वेळेवर ती प्रक्रिया करायची असेल, तेव्हादेखील याची खूप मदत होते.

टीसीएलच्या नव्या वॉशिंग मशीननच्या श्रेणीत ईआरपी A+++ रेटिंग आहे. याचाच अर्थ असा की, या अत्युच्च प्रमाणात प्रभावी असून, तुमचा फार पैसा खर्च न करता कपडे धुण्याची संपूर्ण काळजी घेते. वॉशिंग ड्रमच्या अनोखी हनीकोम्ब रचनेद्वारे कपड्याची नाजूक आणि योग्यरितीने काळजी घेतली जाते. हनीकोम्ब रचनेद्वारे ड्रम आणि कपड्यांमध्ये पाण्याचा हलका थर ठेवला जातो. त्यामुळे या थरावर हलकेपणाने धुण्याची प्रक्रिया होते आणि कपड्यातील धाग्यांचे रक्षण होते.

वॉशिंग मशीन वापरताना, ग्राहकांना त्रासदायक ठरणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे, प्रभावी वापराकरिता, ड्रम स्वच्छ करण्याची समस्या. टीसीएलच्या नव्या वॉशिंग मशीन्समध्ये ऑटो ड्रम क्लीन टेक्नोलॉजी असून यामुळे ड्रम स्वच्छ करण्याची समस्या कायमची दूर होते. तसेच ड्युएल डिटर्जंट केसद्वारे ग्राहकांना मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचे डिटर्जंट निवडता येते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading