Sunday, April 5, 2026
BusinessLatest News

अमेझॉन फ्लेक्स पार्टनर च्या माध्यमातून अनेक कुटुंबांची स्वप्नपूर्तता 

पुणे: अमेझॉन इंडिया या अग्रणीय ई कॉमर्स कंपनीने आपल्या कंपनीच्या विस्तारात वाढ करून नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना अमेझॉन फ्लेक्स पार्टनर च्या माध्यमातून  व्यक्तींनां स्वत: चे बॉस बनण्यासाठी एक नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अमेझॉन फ्लेक्स या प्रोग्रॅम मध्ये नवीन नोकरदार वर्ग स्वतःच स्वतःच्या कामकाजाचे नियोजन करू शकतात तसेच त्यांच्या मोकळ्या वेळेत ग्राहकांना  अमेझॉन   पॅकेजेस वितरीत करून अशा व्यक्तींना त्यांच्या कमाईची क्षमता वाढवण्याची संधी मिळते.

ज्या व्यक्तींना त्यांच्या आर्थिक तसेच इतर परिस्थितीमुळे पारंपारिक कामे करणे जमत नाहीत अशा कोणत्याही व्यक्ती अमेझॉन फ्लेक्स अँपद्वारे प्रोग्रामसाठी साइन अप करू शकतात. या प्रोग्रॅम मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनबोर्डिंग प्रक्रिया सोपी आहे, आणि प्रत्येक डिलिव्हरी पार्टनरला एक व्यापक पार्श्वभूमी सत्यापन प्रक्रियेतुन जावे लागते. अमेझॉन फ्लेक्स प्रोग्रामद्वारे, पुण्यातील शेकडो व्यक्ती ग्राहकांना अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांच्या विनामूल्य वेळेत पॅकेज वितरीत करीत आहेत. २०१९ मध्ये लॉन्च झालेले, अमेझॅन फ्लेक्स ६५हून अधिक भारतीय शहरे आणि गावांमध्ये पसरले आहे आणि त्यामुळे संपूर्ण भारतातील हजारो व्यक्तींचे जीवन बदलले आहे.

अमेझॉन फ्लेक्स पार्टनर या उपक्रमाने पुण्यातील अकील याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपे झाले आहे तसेच भविष्यासाठी बचत करण्यास सक्षम केले आहे. कुटुंबाचा एकमात्र अन्नदाता म्हणून, अकीलने अनेक नोकऱ्या केल्या, त्याने कठोर परिश्रम केले परंतु पुण्यातील आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमाई पुरेशी नव्हती. अकीलने सातत्याने पार्टटाइम कामाच्या संधी शोधल्या ज्यामुळे त्याला इतर गोष्टी करण्यासाठी वेळ मिळेल आणि त्याची कमाई वाढेल. सन 2019 दरम्यान, अकीलने अनके पर्याय शोधले आणि अकील या प्रोग्राममध्ये सहभागी झाला .

अमेझॉन फ्लेक्स पार्टनर बद्दल पुण्यातील रहिवासी अकील म्हणाला की गेल्या दोन वर्षांपासून एक अतिशय फायदेशीर अनुभव आला आहे ज्याने मला माझे क्षितिज विस्तारत करण्यास सक्षम केले आहे. अमेझॅन ग्राहकांना ‘स्मित’ वितरीत करून मी माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक वचनबद्धतेचे व्यवस्थापन करण्यास सक्षम आहे. लॉकडाउन दरम्यान सुद्धा, मी माझ्या बऱ्याच   मित्रांना पाहिले आहे उत्पन्न मिळवण्यासाठी संघर्ष करीत असताना, अमेझॉन फ्लेक्समुळे दररोज ३-४ तास काम करून पूरक कमाई आम्हाला मिळत राहिली.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading