Tuesday, June 16, 2026
BusinessLatest NewsLIFESTYLE

ग्राहकांना एटीएममधून कोणत्याही वेळी काढता येणार ताजे दूध

पुणे : गोपी डेअरीच्यावतीने पुण्यातील पहिले म्हशीच्या ताज्या दूधाचे एटीएम ( Milk ATM) दीप बंगला चौक, मॉडेल कॉलनी येथे उभारण्यात आले आहे. कोरोनासदृश्य परिस्थितीत सामाजिक अंतर राखणे अतिशय आवश्यक ठरते, या परिस्थितीत हे दूधाचे एटीएम उपयोगी पडणार आहे. यामध्ये 4 डिग्री सेल्सियसपर्यंत एटीएम मधील तापमान असणार आहे. या एटीएमचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक त्यांच्या गरजेनुसार कितीही प्रमाणात दूध घेऊ शकतात, एटीएम मधील दूध हे कोणतीही प्रक्रिया न केलेले शुद्ध दूध असणार आहे. अशी माहिती गोपी डेअरीचे अथर्व कुलकर्णी यांनी दिली.

कोविड सारख्या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे दुकाने अर्धवेळ बंद असतात परंतु या दूधाच्या एटीएममधून कुठल्याही वेळी दूध घेता येणार आहे. हे दूध शुद्ध, ताजे व प्रक्रिया न केलेले असणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या द्र्ष्टीने देखील ते फायद्याचे आहे.

अथर्व कुलकर्णी म्हणाले, दुधाचे तापमान 4 डिग्री सेल्सियस पर्यंत कायम ठेवण्यात येते ज्यामुळे त्याची गुणवत्ता टिकेल. ग्राहकांना बाजारात अर्धा लिटरच्या पुढे दूध घ्यावे लागते. परंतु एटीएममधून त्यांना गरजेनुसार 10 रुपयांपासून पुढे कितीही दूध घेता येईल. जर ग्राहकांनी स्वतःचे कंटेनर (किटली) आणले तर आम्ही प्लास्टिकचा वापर टाळणार आहोत. हे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ह्द्याच्या आरोग्यासाठी म्हशीचे दूध उपयुक्त ठरते. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे. रक्तवाहिन्या लवचिक ठेवून उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास कॅल्शियम मदत करते, ज्यामुळे रक्ताचा सहज प्रवाह सुनिश्चित होतो. कॉपर, मॅंगनीज, फॉस्फरस आणि झिंकचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टिओपोरोसिस आणि आर्थरायटिस सारख्या हाडांशी संबंधित आजार होण्यापासून रोखण्यास ते मदत करू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading