fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

सैनिकांच्या निस्पृह योगदानाबाबत भारतीय सदैव कृतज्ञ -सुभाष भामरे

पुणेः- प्रत्येक जवान हा मायभुमीच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने जीवाची बाजी लावून सीमांचे संरक्षण करीत असतो. तीन्ही दलांच्या या सैनिकांचा आम्हांला भारतीय म्हणुन अभिमान आहे सैनिकांच्या निस्पृह योगदानाबाबत भारतीय सदैव कृतज्ञःची भावना बाळगून आहेत, असे मत माजी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.
आजच्या 26 जुलै, कारगिल विजय दिवसा निमित्त आणि गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाशपर्वा निमित्त सरहद संस्था आणि लडाख पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनच्या निमित्ताने कारगिल सद्भावना दाैडचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल वॅार मेमोरियल येथे सुभाष भामरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.या दाैडचे उद्घाटन कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनचे समन्वयक राजेश पांडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. शनिवार वाडा येथेून प्रांरभ झालेली ही दाैड घोरपडी येथील सऊदर्न कमांड नॅशनल वॅार मेमोरियल येथे समाप्त झाली.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर संघटन सरचिटणीस आणि कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनचे समन्वयक राजेश पांडे,
कोहिनूर उद्योग समुहाचे प्रमुख आणि तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, तेग बहादूर 400 वे प्रकाश पर्व समितीचे आयोजक संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, तेग बहादूर 400 वे प्रकाश पर्व समितीचे कार्यकारी अध्यक्ष चरणजित सिंग सहानी, तेग बहादूर 400 वे प्रकाश पर्व समितीचे कार्यकारी अध्यक्ष सुरेंद्र वाधवा, मॅरेथॉनचे मुख्य संयोजक अरविंद बिजवे, तेग बहादूर 400 वे प्रकाश पर्व समितीचे सदस्य अमर छाबडा, नरिंदर पाल सिंग बक्षी, सुरिंंदर सिंग धुपर, दलजित सिंग रॅंक, अर्हम फौंडेशनचे अध्यक्ष डाॅ. शैलेश पगारीया, युवराज शहा, आदी मान्यवर उपस्थित होते.
सुभाष भामरे पुढे म्हणाले, संरक्षण राज्य मंत्री असतांना आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिन्ही दलांना अतिषय जवळून पाहण्याची संधी मिळाली आपल्या सीमा जवळून पाहता आल्या. त्यांचे अतुलनीय धाडस पाहता त्यांना सॅल्युट करावसेच वाटते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading