Pune Rain – खडकवासला धरणातुन २५ हजार ३८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू, भिडेपूल पाण्याखाली, नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात होत असलेल्या संततधार पावसाने धरणसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला धरण जवळपास भरले असून धरणातून आज चार वेळा विसर्ग वाढवण्यात आला. रात्री ११ वाजता २५ हजार ३८ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली गेला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   

खडकवासला धरणात आज चार वेळा विसर्ग वाढवण्यात आला. यामध्ये आज दुपारी तीनपर्यंत १. ७५ टीएमसी (८८.५२%) पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून २ हजार ४६६ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत होता. त्यानंतर पाणी साठयात होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेता रात्री ८ वाजता १००९६ क्युसेक वेगाने, तर रात्री १० वाजता १८ हजार ४९१ क्यूसेक्स इतका विसर्ग करण्यात आला आहे. तसेच त्री ११ वाजता २५ हजार ३८ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी दिली.

यंदा धरणात मागील वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे.  मागील वर्षी आजच्या दिवशी चार ही धरणात मिळून 15.82 टीएमसी म्हणजे 25.60 टक्के पाणीसाठा जमा होता. यंदा तो 20.25 टीएमसी म्हणजे 75.90टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजे मागील वर्षी पेक्षा 10.200 टीएमसी म्हणजे 187 टक्के जास्त पाणीसाठा जास्त जमा असल्याची माहितीही विजय पाटील यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: