डोंगराळ भागात उभारण्यात येणाऱ्या महाविद्यालयासाठी गणेशोत्सव मंडळातर्फे वीटा आणि सिमेंटची मदत

पुणे : वीटे वर वीट रचूया ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता महाविद्यालय उभारूया..असा संकल्प करीत पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी भिमाशंकर जवळील पोखरी गावात उभारण्यात येणाऱ्या महाविद्यालयाच्या इमारतीसाठी मदत दिली आहे. यासाठी 2100 वीटा आणि 40 सिमेंटची पोती मंडळांतर्फे देण्यात आली आहेत. गुरुवार पेठेतील वीर शिवराज मित्र मंडळ व येरवड्यातील नवज्योत मित्र मंडळ यांनी ही मदत केली आहे.

श्री पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ही मदत देण्यात आली आहे. यावेळी पियुष शाह, अक्षय रजपूत, प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे,धनश्री साळवे व नांदेड सिटी मैत्री कट्टाचे मयुर पाटील, अमोल कळमकर बाळासाहेब निचल, विवेक चित्तोडकर उपस्थित होते

किरण सोनीवाल म्हणाले, जय गणेश व्यासपीठ मधील गुरुवार पेठेतील वीर शिवराज मित्र मंडळ व येरवड्यातील नवज्योत मित्र मंडळ या मंडळांनी आगळावेगळा उपक्रम राबववित पोखरी गावात बांधण्यात येणाऱ्या पंढरीनाथ उच्च महाविद्यालयाच्या इमारतीसाठी मदत केली. भिमाशंकरजवळील डोंगराळ भागात हे महाविद्यालय उभे राहणार आहे. हे महाविद्यालय उभे राहिल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी येथे शिक्षण घेऊ शकतील.

पीयूष शाह म्हणाले, पोखरी गावाच्या डोंगराळ भागात एक महाविद्यालय उभे राहिले तर पुढच्या अनेक पिढ्या शिक्षण घेऊ शकतील. गावातील  मुले 12 वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकत नव्हते. शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना मंचरच्या पुढे दररोज ये-जा करून घ्यावे लागत असे. परंतु महाविद्यालय उभे राहिल्यामुळे त्यांना गावातच शिक्षण घेता येईल. या महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी  देखील मंडळाच्या वतीने पुस्तके देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: