Pune – गेल्या 24 तासात कोरोनाचे  333 नवीन रुग्ण

पुणे: पुणे शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे  पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 333 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे  तर 187रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85हजार 035
इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73हजार 313इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 6तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8715जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये सध्या 3007अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 224 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 7791स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: