संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या ‘तज्ञ संचालक’ पदी कौस्तुभ दबडगे व डॉ. रणजित निकम यांची नियुक्ती

पुणे : संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाने आजअखेर पतसंस्थेची जबाबदारी चोखपणे पार पाडली असून आता संस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळामध्ये जाणकार व तज्ञ लोकांची नेमणूक आज करण्यात आली. त्यामध्ये वाणिज्य क्षेत्रातील व्यक्तिमत्व कौस्तुभ दबडगे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व डॉ.रणजित निकम यांना हा पदभार दिला असून संकल्पचे अध्यक्ष स्वप्नील घायाळ यांच्या हस्ते कौस्तुभ दबडगे व डॉ.रणजित निकम यांना नियुक्ती प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी उपाध्यक्ष शेखर ढमाले, अशोक भंडारी, सचिव ऋषीकेश मनोरे,सुमित गुळवे, ज़तिन गुजराथी, विकास प्रभुणे,विनायक दलभंजन, रविराज बुर्से,निखिल सिन्नरकर, चित्रपट निर्माते संदीपदादा मोहिते पाटील तसेच मित्रपरिवार उपस्थित होते.

पुण्यातील संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटी ही ​संकल्प उद्याचा, उज्ज्वल भविष्याचा हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेल्या या पतसंस्थेने एक वर्षापेक्षा कमी कालावधीतच लोकांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी वाटचाल सुरु केली आहे. एकीकडे लोकांना गुंतवणुकीचे मार्ग कमी होत असताना संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीने नवनवीन योजना बाजारामध्ये आणून छोट्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. तसेच कमी व्याजदराच्या कर्ज योजना आणून देखील छोटया व्यावसायिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.​ कोरोना महामारीमध्ये नवीन व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज देण्याची योजना संकल्प मध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: