OBC आरक्षण – बारामतीत 29 जुलैला सर्वपक्षीय एल्गार महामोर्चा

पुणे : ओबीसी आरक्षण ( OBC Reservation) कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 29जुलैला बारामती येथे पाहिला एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गावोगावी घोंगडी बैठका घेण्यात आल्या आहेत. या मोर्चात नाना पटोले, विजय वडेट्टीवर, चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, राम शिंदे, योगेश टिळेकर आदी सर्वपक्षीय ओबीसी नेते सहभागी होणार आहेत.  छगन भुजबळ यांनाही आमंत्रीत केले आहे.

 
माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कोले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मच्छिंद्र टिंगरे, बापूराव सोलंनकर, नानासाहेब मदने, चंद्रकांत वाघमोडे, संभाजी चव्हाण उपस्थित होते. 
 
दरम्यान या मोर्चासाठी स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे. तरी देखील संयोजक समिती मोर्चा घेण्यावर ठाम आहे. मोर्चा मध्ये कलमं 144 चे हनन होत आहे याची आम्हाला जाणीव आहे.  परंतू इतर समाजाचे मोर्चे, राजकीय कार्यक्रम चालूच आहे. त्यामुळेच ओबीसी हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहोत. ओबीसी हा शांतताप्रिय समाज आहे. त्यामुळे बारामती मधील हा मोर्चा शांततेत पार पाडेल, अशी ग्वाही आरक्षण कृती समितीच्यावतीने यावेळी देण्यात आली. 

Leave a Reply

%d bloggers like this: