ऍड. प्रकाश आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप आणि आत्ताची स्थिती लक्षात घेता, डॉक्टरांनी अजून किमान दीड महिना भेटी-गाठींना सक्त मनाई केली आहे.

आ. बाळासाहेबांशी संबधित सर्व पक्ष-संघटनांमधील कार्यकर्त्यांची अस्वस्थता, काळजी बाळासाहेबांना आणि सर्व आंबेडकर कुटुंबियांनाही समजते आहे. पण आत्ता पर्यंत आपण सर्वानी जसे सहकार्य केलेत तसे ह्या पुढेही कराल अशी खात्री आहे. अशी माहिती प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी फारुख अहमद यांनी मेडिकल बुलेटिन द्वारा दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: